पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवैध वाळू साठ्यावर महसूल प्रशासनाची कारवाई

इमेज
  10 ब्रास वाळू साठा, 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर :-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे कासेगांव (ता.पंढरपूर) येथे  अवैध  वाळू साठ्यावर  धडक कारवाई  केली असून, त्यामध्ये  10 ब्रास वाळू  व 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक व साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. अवैध गौण खनिज विरोधी पथकाने मौजे कासेगाव येथील गट नंबर 27/ 1अ  येथे अचानक भेट दिली  असता,  सदर ठिकाणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांच्या  नावे असलेल्या गट नंबर 27/ 1अ  मध्ये 10  ब्रास  अवैधरित्या वाळूसाठा  केलेला दिसून आला. तसेच सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी एमएच 11 एजी 2274 या क्रमांकाचा वाळूसाठी वापरण्यात येणारे पिकअप हे वाहन दिसून आले. तसेच वाहनामध्ये  वाळू भरण्यासा