पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर !

इमेज
      अपघात करून पळाले पण  काही मिनिटातच अडकले !   पंढरपूर : मोटार सायकलला जोराची धडक देऊन त्यांनी अपघात केला, जखमींना मदत करण्याचं नाटकही रंगवलं आणि जखमीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मोठ्या कौशल्याने वेगवेगळ्या दिशेने पळ काढायचा प्रयत्नही केला पण पोलिसांच्या दक्षतेमुळे काही मिनिटातच पोलिसांच्या ताब्यात आले.    अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी मोबाईल घेऊन फोटो काढणारे अनेकजण पाहायला मिळतात पण  आपल्याच हातून अपघात होऊनही जखमीला उपचारासाठी नेण्याऐवजी मदतीचे नाटक करून धन्यता मानणारे संवेदनाहिन माणसांचे रूप या अपघातात दिसून आले आहे नवीन सोलापूर मार्गावर पंढरपूर येथे अहिल्या चौकाजवळ ही घटना घडली असून एका पत्रकाराने त्वरित ही माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर याना कळवली आणि त्यानंतर पाठलाग नाट्य सुरु झाले.   पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव  येथील एक मोटारसायकल चालक अहिल्या चौकाकडून पंढरपूरकडे येत होते. अहिल्या चौकाजवळील देवगड मठासमोर MH 11 BV 2233  या स्काॅर्पिओ ने मोटारसायकलीस (MH 13 CH 7286) जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले एक जण जखम

पंढरपुर - सातारा व पंढरपूर- पुणे दोन महामार्गावरील वाहतुक ठप्प

इमेज
पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस... उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी... पंढरपूर / प्रतिनिधि : मागील दोन दिवसापासुन पंढरपूर, सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कासाळ ओढ्याचे नदीत रुपांतर झालेचे चिञ सध्या पहावयास मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी देखील उपरी, भंडीशेगाव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी आले आहे.     यामुळे पंढरपूर - सातारा व पंढरपूर फलटण, पंढरपूर - इंदापुर - पुणे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.  या मार्गावरील वाहतुल पोलीस प्रशासनाने बॅरेकेटिंग टाकुन बंद केली आहे.   प्राताधिकारी सचिन ढोले , उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे,  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके हे अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या मदतीने ओढ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करीत आहेत.  पो नि प्रशांत भस्मे हे उपरी, भंडीशेगाव याठिकाणी थांबुन परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. सातारा - पुणे मार्गावरील वाहतुक बंद केली आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे राञी दहा वाजता उपरी, भंडीशेगाव येथे दाखल झाले अ

आयपीएस निखील पिंगळे लातुरचे पोलीस अधिक्षक..

इमेज
सोलापुरचे मनोज पाटील यांची अहमदनगरला बदली पंढरपूर / प्रतिनिधि : शासनाने गुरुवारी राज्यातील काही पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर पोलीस अधिक्षक म्हणुन बदली केली आहे. तर पंढरपूरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांची लातुर पोलीस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.    ते सध्या समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट १३ नागपुर येथे कार्यरत आहेत. सोलापुरच्या जिल्हा पोलीस प्रमुख पदी शासनाने अद्याप कोणाची नियुक्ती केली नसुन नवीन पोलीस अधिक्षकपदी कोणाची नियुक्त होणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी अपर पोलिस अधीक्षक म्हणूनही  सोलापुरात काम केले होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोरी, घरफोडी यावर नियंत्रण ठेवले आहे. नागरिकांशी जनसंपर्क वाढवून चांगल्या पद्धतीचे पोलिसिंग केले आहे.तसेच आषाढी वारीचा बंदोबस्तातही चांगले नियोजन केल. सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही विविध उपक्रम राबवले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्यांनी आपल्या कार

पोलीस प्रशासनाने जड वाहतुक केली बंद...

इमेज
उपरी येथील कासाळ ओढ्याला पूर ...  पंढरपूर / प्रतिनिधि :   बुधवारी रात्री पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने कासाळ ओढ्याला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे ओढ्याचे नदीत रुपांतर झाल्याचे चिञ सध्या उपरी ता पंढरपूर परिसरात पहावयास मिळत आहे. दरम्यान शिंगोर्णी ता माळशिरस येथून एक चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामध्ये चालक बेपत्ता झाला आहे. गेल्या वीस वर्षानंतर या भागात मोठा पाऊस झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन पोलीस प्रशासनाने पंढरपूर - सातारा मार्गावरील जड वाहतुक बंद केली आहे.   मुसळधार पावसामुळे कासाळ ओढ्याला पूर आला असून पूराच्या पाण्यात अनेक पीके वाहून गेली आहेत. ओढ्याकाठचे विजेचे खांब देखील वाहून गेल्याने आठ ते दहा गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान उपरी येथील पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. रात्री अचानक परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस,डाळींब,पपई यासह शेती पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील तीन चार दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळे ओढ्यावरील अनेक बंधारे पाण्याखाली

मायक्रो फायनान्सच्या तगाद्यामुळेच सुनेची आत्महत्या....

इमेज
    सासू सुनीता निकम यांचा आरोप....  निराधार झालेल्या आजी  -  नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतला पुढाकार पंढरपूर:  प्रतिनिधी : सध्या महिलांना बचतगट हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.त्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे  आपल्या सहकाऱ्यांसह  प्रयत्न करीत आहेत. अशातच पंढरपूर मधील डाळे गल्ली येथील मनीषा अभय निकम या विधवा तरुण महिलेने मागील काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती आत्महत्या केवळ महिला बचत गट वसुली वाले यांनी वसुलीसाठी दिलेल्या त्रासामुळेच झाली असल्याची कबुली आज मयत महिलेची सासू सुनीता अरुण निकम यांनी पत्रकार समोर दिली असल्याने महिला मधून संताप व्यक्त केला जात आहे.     या घटनेमुळे निकम यांच्या घरातील छोटी मुलगी आणि सासू निराधार झाली आहेत.या निराधार आजी नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला असून त्या दोघींना दत्तक घेऊन त्यांच्या सर्व आर्थिक खर्चाची जबाबदारी दिलीप धोत्रे यांनी पत्रकार समोर स्वीकारली आहे. यापुढील घटना टाळण्यासाठी आता बचतगट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा मनसेचा निर्धार  :

बॅका व फायनान्सची हप्ते वसुली थांबवा..

पंढरपूर/ प्रतिनिधि :  आज    संपूर्ण देशात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना बँका व प्रायव्हेट फायनान्स कंपन्या नी १ सप्टेंबर पासून सक्तीने हफ्ते वसुली सुरू केलेली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत मोरेटरियम ची अंतिम तारीख असताना केंद्र सरकारने व सुप्रीम कोर्टाने यावरती १ सप्टेंबर ला निर्णय देणं अपेक्षित होतं, पण अजूनही तसा कोणताच निर्णय घेतलेला नाही. देशातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना, युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख हा खेळ चालत राहील. RBI व केंद्र सरकारच्या मेंदूला गँगरीन झालाय का ? लोकांचे हफ्ते हे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात असतात. सरकारने व कोर्टाने निर्णय घ्यायला जर १५ दिवस लावले तर सर्वसामान्य लोकांनी या हफ्ते वसुलीला कसं तोंड द्यायचं ? कोरोणा मुळे कुटुंब चालवणं ही अवघड असताना हफ्ते जर भरावे लागणार असतील, तर येत्या महिनाभरात आत्महत्यांचे प्रमाण वाढेल आणि याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असेल. महाराष्ट्र सरकारने या विषयाचा येत्या ४-८ दिवसात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व आम्हाला डिसेंबर पर्यंत moratorium ची मुदत वाढ मि

जुना राग झाला अनावर आणि हातात घेतला कोयता !

इमेज
'तो' म्हणाला, आज नाही सोडत ! आणि त्याने मारून टाकलेही! पंढरपूर : 'तो' त्यांच्या घरी गेला आणि म्हणाला, 'तुला आज सोडत नाही', ..... काही वेळाने त्याने त्यांना पुन्हा गाठले आणि ' आज तुला जित्ता ठेवत नाही' असं  म्हणत त्याने खरोखरच कोयत्याने वार करायला सुरवात केली आणि काही क्षणात त्याना मारूनही टाकले!   पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथे सुरु झालेली ही घटना घडली देगावच्या शिवारात, चार वर्षांपासून मनात धरलेल्या रागाने एकाच जीव गेला पण याचे  मात्र तुरुंगाची हवा खायचे दिवस सुरु झाले. पंढरपूर तालुक्यातील बाभुळगावचे सतीश उर्फ बाळू हरी पवार, त्याचे वडील  आणि लाला बबन शिंदे यांच्यात जुने वैमनस्य होते त्यातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळूचे आईवडील त्यांच्या शेतातील घरी असताना आरोपी लाला बबन शिंदे तेथे आला. सन २०१६ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून भांडणाला सुरुवात केली आणि सतीश उर्फ बाळू पवार यांच्या वडिलांना ' हऱ्या, आज तुला ठेवत नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत सतीशला दगड फेकून मारले. फिर्यादी सतीश याच्या उजव्या खांद्यावर आणि पोटावर यामुळ