पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉल्बीच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला : पाणीवेसच्या 15 कार्यकर्त्यांची मुक्तता

इमेज
  अँड . शशी कुलकर्णी सोलापूर / प्रतिनिधी :  येथील (पाणीवेस) दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर सुभाष सिरसट, निलेश शंकर काटकर, सुरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार बंडोबा पवार,आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार(जाधव), रोहित सुभाष सातपुते, अभिजीत विजयकुमार हविनाळ, निखिल सुनिल भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरुन, पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अति. सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, दि ६ जानेवारी २०१५ रोजी पोलीसांना डोणगांव रोडवरील एका फार्म हाऊसवर डॉल्बीचा आवाज ऐकू आल्याने रात्र गस्तीवर असणारे कर्मचारी/ पोलीस उपनिरिक्षक विश्वास भाबड व त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी वानकर फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांना अंदाजे २० ते २५ तरुण डॉल्बीवर मद्यधुंद अवस्थेत नाचत असताना आढळून आले. त्यांना डॉल्बी बंद करण्यास सांगितले

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

इमेज
  गुरसाळे बंधारेवर मयताची पाहणी करताना पो नि मिलींद पाटील, सपोनि ओलेकर  पंढरपूर / प्रतिनिधी :   गुरसाळे ता पंढरपूर येथील बंधारेत  पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे वय 35 -40 वर्षे सडलेल्या अवस्थेत दिनांक 19 आँक्टोबर  रोजी सकाळी 10 वाजता  मिळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पंढरपूर तालुका पोलीस सदर मयताची ओळख पटवणेसाठी अधिक तपास करीत आहेत.   आमचेकडे सर्व प्रकारचे गाड्या योग्य दरात भाड्याने मिळतील :  +919503093385  सदर मयताच्या डाव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत  'आश्विनी' व  बदाम  आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आहे .  मयताचे हातावरील गोंदलेले नाव त्याचबरोबर त्याचे अंगात पिस्ता रंगाचा शर्ट असून कॉलरचे आतील बाजूस  Cruze India असे लेबल असलेला शर्ट व निळ्या- राखाडे रंगाची  अंडरविअर खिशात लाल रंगाची तंबाखूचा बटवा आहे.  सदर मयताचे  वय अंदाजे 35 - 40 वर्ष असून  उंची अंदाजे 5 फुट 6 इंच आहे.  तरी वरील वर्णनाचे मयत व्यक्ती बाबत माहिती मिळाल्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क करणेचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे .    पो नि मिलिंद पाटी