पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कान्हापुरीच्या सरपंचपदी प्रेम चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे बिनविरोध

इमेज
पंढरपूर/प्रतिनिधि: कान्हापुरी ता.पंढरपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेम रघुनाथ चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.महामुनी, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब यांनी काम पाहिले.       पंढरपूर तालुक्यात लक्ष लागुन राहिलेल्या कान्हापुरी ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी जुन्या पुढार्याना डावलुन युवा पिढीकडे मतदान रूपी सत्ता हातात दिली.सरपंचपदी युवक नेते प्रेम चव्हाण यांची निवड झाल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल दयानंद शिंदे, राणी दिपक फराडे, गोकुळ गिरआप्पा पाटील, मैहबुब रसुल देशमुख यांचेसह माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव शिंदे, माजी सरपंच रघुनाथ चव्हाण, गणपत फराडे, कुमार शिंदे, कासम देशमुख, युवराज चव्हाण, अनिल पवार, नितिन चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, महादेव मुंडफुणे, महादेव कारंडे, ईश्वर काळेल, रमेश शिंदे, ईश्वर शिंदे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच, उपसरपंच, नुतन सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला.      नुतन सरपंच, उपसरप

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण नव्याने काढण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

इमेज
पाच गावातील नागरिकांनी चुकीच्या  आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात घेतली होती धाव पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण  २७ जानेवारी रोजी काढणेत आले होते. या चुकिच्या आरक्षणाबाबत तालुक्यातील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली,  गावातील नागरिकांनी अॅड विजय जाधव यांचे वतीने  मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आरक्षण बदलण्याची मागणी केली होती . यावर जिल्हाधिका-यांनी सुनावणी घेणेचे आदेश न्यायालयाने दिले होते.     सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सुनावणी पुर्ण केली. सुनावणी दरम्यान देखील सुपली, गादेगाव, उंबरे पागे, उपरी, नारायण चिंचोली चे आरक्षण बदलण्याचा युक्तिवाद अॅड विजय जाधव यांनी केला.  जिल्हाधिकारी यांनी    पंढरपूर तालुक्यातील अनुसुचित जमाती व अनुसुचित जमाती महिलेसाठी काढणेत आलेले आरक्षण कायम‌ केले आहे. माञ अनुसुचित जाती, ना.मा. प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने आरक्षण काढणेचा आदेश दिला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील आरक्षण बदलणार असुन दि २२ फेब्रुवारी रोजी नव्याने आरक्षण काढणेत येणार आहे.

पंढरपूर जवळ भिषण अपघात....चार जणांचा जागीच मृत्यू ... एक गंभीर जखमी

इमेज
मयत कोल्हापुर जिल्ह्यातील पंढरपूर / प्रतिनिधि : पंढरपूर - सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगावजवळ आज सकाळी सहा वाजता भिषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रुकवर बोलेरो जीप जावुन धडकलेने चार जणांचा जागीच मृत्यु झाला असुन एक गंभीर जखमी असलेची  माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलि.  सर्व मयत कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.    मयतामध्ये एक पुरुष, दोन महिला, एका लहान मुलीचा समावेश आहे.  एका गंभिर जखमीस उपचारासाठी पंढरपूर मध्ये दाखल करण्यात आले आहे.  घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो नि किरण अवचर यांनी भेट दिली असुन अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत