पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामान्य माणसांना 'आपला' वाटणारा नेता गेला !

इमेज
  नाना गेले !    पंढरपूर : गेल्या काही दिवसापासून असलेली भीती अखेर काल रात्री प्रत्यक्षात उतरली असून तालुक्याचे उमदे आणि रांगडे नेतृत्व आमदार भारत भालके यांचे निधन झाले असून पंढरपूर तालुक्याला हा जबर धक्का बसला आहे.    आमदार भालके यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर होते.आमदार भारत भालके हे गेल्या आठ  दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार घेत होते. काल त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि रात्री त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री भरणे हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.आमदार  भारत भालके यांना कोरोनाची बाधा  झाली होती. त्यातून बरे होऊन ते परत आलेही होते परंतु पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली.  त्यांच्या जाण्याने  पंढरपूर तालुक्याला जबर धक

पांडुरंगाचा प्रसाद मिळणार घरपोच

इमेज
  पांडुरंगाचा प्रसाद आता पोहोचणार घरी पंढरपूर : गेल्या नऊ महिन्यापासून भाविक विठूमाऊलीच्या दर्शनापासून वंचित तर आहेतच पण त्याच्या प्रसादापासूनही भाविक  दुरावला आहे, भाविकांसाठी या प्रसादाचं महत्व अनन्यसाधारण असून यापुढे भाविकांना घरपोहोच प्रसाद मिळणार आहे.    पंढरीत आलेला सर्वसामान्य भाविक विठूमाऊलीचे दर्शन घेतो आणि परतताना पांडुरंगाचा प्रसाद घेऊनच पंढरीचा निरोप घेत असतो. गेल्या नऊ महिन्यापासून भक्तांचा पांडुरंगच बंद दाराआड राहिल्याने वारकरीही पंढरीला येऊ शकला नाही आणि त्याला प्रसादापासूनही वंचित राहावे लागले आहे. पंढरीला येऊ न शकलेले भाविक हा प्रसाद घेताच पंढरीची वारी घडल्याचं  समाधान मानतात. या भाविकांना गेल्या नऊ महिन्यापासून हा प्रसाद मिळाला नाही आणि मंदिर उघडले असले तरी दर्शनाच्या मर्यादा असल्याने आणखी किती काळ लागेल हे देखील अंदाजाच्या पलीकडे आहे.  पांडुरंगाच्या प्रसादापासून दूर असलेल्या भाविकांना घरपोहोच प्रसाद देण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने एक कौतुकास्पद नियोजन केले असून देशभरातील भाविकांना प्रसाद घरपोच करण्यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने '

पराभव दिसल्याने निवडणूकित डमी उमेदवार उभा केला - समाधान घाडगे

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधी –  शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहा वर्षात आ. दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी सभागृहात व सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवला आहे.  अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे पराभव दिसल्याने निवडणूकित दत्ताराव सावंत नावाचा डमी उमेदवार विरोधांनी उभा करीत गावठी राजकारण  करीत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षक मतदार हाणून पाडतील असा विश्वास राज्य शाळा कृती समितीचे संघटक समाधान घाडगे यांनी व्यक्त केला. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असून आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.   यापूर्वी राजकिय पक्ष हे शिक्षक मतदारसंघात वैयक्तिक लक्ष देत नव्हते परंतु यावेळी राजकिय पक्षांनी लक्ष घालत निवडणूकित शिक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला शिक्षकांमधून तीव्र विरोध होत आहे.   शिक्षकांचे प्रश्न शिक्षक चळवळीत काम करणारे आ दत्तात्रय अच्युतराव सावंत हे एकमेव उमेदवार असल्याने हेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास समाधान घाडगे यांनी व्यक्त केला.आ दत्तात्रय सावंत यांनी विस-पंचवीस वर्षे सातत्याने शिक्षका

पंढरपूर शहरात पुन्हा संचारबंदी.....

इमेज
२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर ला येणारे सर्व बस राहणार बंद पंढरपूर / प्रतिनिधि : कोरानाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची चैञी, आषाढी याञा रद्द झाली. याच धर्तीवर कार्तिकी याञा देखील रद्द करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे.  यामुळे पंढरपूर शहरासह आसपासच्या ८ ते १० गावांमध्ये   २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान संचारबंदी लागु करण्यात येणार आहे.  याचबरोबर राज्यभरातुन पंढरपूर ला येणारे   सर्व बससेवा  २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पञकार परिषदेत दिली.    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर, पो नि प्रशांत भस्मे आदि उपस्थित होते.  कार्तिकी याञेसाठि पंढरपूर शहरात दिंड्या येवु नयेत यासाठी शासनाने बंदी घातली आहे.  पोलीस प्रशासनाच्यावतीने तिहेरी बंदोबस्त लावण्यात येणार आहे.  यासाठी १०० पोलीस अधिकारी, १२२१ पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड, एक एसआर एफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे

चैन्नई येथे गोळीबार करुन खून करणारे आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केले जेरबंद

इमेज
  सिनेस्टाईल पाठलाग करीत रिव्हाॅल्वरसह तीन आरोपींना पकडले पंढरपूर / प्रतिनिधि :  तामीळनाडू राज्यातील चेन्नई येथे गोळीबार करीत खून करणारे आरोपींना सोलापूर ग्रामीण पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले.  आपले हद्दीत अथवा आपले राज्यात गुन्हा दाखल नसतानाही पळून जाणारे आरोपींना जेरबंद केलेमुळे सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या कामगिरीची कौतुक होत आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की,  तामीळनाडू राज्यातील चेन्नई येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या कारणांवरुन गोळीबार करीत आरोपींनी खून केला. खून करून सदरचे आरोपी हे    लाल रंगाच्या व्हाॅल्सवेगन कारने हैद्राबाद - सोलापूर रोडने पुणेच्या दिशेने फरार झालेची माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली.  घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी  जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्याचे आदेश सर्व पोलीस निरीक्षकांना दिले.  याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा व सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी - कर्मचा-यांना योग्य सुचना देत हैद्राबादच्या दिशेने रवाना केले .   संशयित कार ही बोरामणी गावाच्या हद्दीत दिसताच

कंन्टेनरच्या धडकेत तुंगतच्या दोन तरुणांचा मृत्यू

इमेज
बाळे येथील घटना  पंढरपूर / प्रतिनिधि : कारचे टायर पंम्चर झालेने  टायर खोलत असताना पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या कंन्टेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये  सारंग प्रकाश रणदिवे (तुंगत ता पंढरपूर), संजय विठोबा अमंगे (रा. मानेवाडी ता. मंगळवेढा हल्ली  तुंगत)  या तरुणांचा मृत्यु झाला.      सोलापुर - पुणे महामार्गावरील बाळे येथील सुयोग हाॅटेलजवळ हा भीषण अपघात रविवारी राञी १०.३० वा.    झाला. एम एच १३ एझेड ७२३४ या कारने हे तरुण लातुरहून तुंगत असा प्रवास करीत होते. कार पंम्चर झालेने टायर खोलत असताना ट्रक नं सीजी ०४ एमपी १४५७ ने धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पळुन गेला असुन पोलीसांनी ट्रक‌ ताब्यात घेतला आहे. अधिक तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात घोषणाबाजी

इमेज
जय जिजाऊ.. जय शिवरायच्या घोषणेने शिवाजी चौक परिसर दणाणला.... पंढरपूर / प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा आज काढण्यात  येणार आहे. यासाठी मराठा समाज बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे.        शिवाजी चौकात जमलेल्या मराठा समाज बांधवांनी जय जिजाऊ... जय शिवराय... एक मराठा ... लाख मराठा  अशा घोषणा देवुन परिसर दणाणुन सोडला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलीस निरीक्षक, ३१ सपोनी/ उपनिरीक्षक ५०० पोलीस कर्मचारी, एक एस आरफ तुकडी असा बंदोबस्त तैनात केलेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.  कोरानाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मंदिर परिसरात संचारबंदी व शहरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तरीही  आंदोलक आंदोलन करण्यास ठाम आहेत. यामुळे या आंदोलकाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर तालुका पोलीसांनी केले रॅपिड टेस्ट तपासणीचे शिबीर

इमेज
सोलापूर :  दैनंदिन कामकाजाकरीता  सामान्य लोकांसोबत नेहमी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे संपर्क येत असतो. ल पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्ठीने  सोलापूर तालुका पोलीस स्टेेशनचे पो नि  सुहास जगताप यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता रॅपीड अॅन्टिजन टेस्ट शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.  सदरचे शिबीर  उत्तर सोलापूर चे वैदयकीय अधिकारी एस.पी. कुलकर्णी यांच्या मदतीने करण्यात आले होते.  सदर शिबीरामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, तसेच सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण येथील अधिकारी व पोलीस अंमलदाराची असे एकुण 53  रॅपिड एॅटीजन तपासणी व 15 आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली.   सदर तपासणीमध्ये कोणीही अधिकारी व अंमलदार हे कोव्हीड 19 पाॅझीटीव्ह आढळुन आले नाहीत.  सदरचे शिबीर हे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,  आरोग्य अधिकारी  डाॅ. शितलकुमार जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक  अतुल झेंडे,         उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर तालुका पोलीस निरीक्षक सुहास जगताप, वैदयकीय अधिकारी उत्तर सोलापूर एस.पी.कुलकर्णी

आजपासुन दोन दिवस पंढरपूर ला येणारे सर्व बस वाहतुक बंद

इमेज
दोन व अधिक व्यक्तिंनी पंढरपूर मध्ये एकञ आलेस होणार कारवाई.... पंढरपूर / प्रतिनिधि : आज गुरुवारी राञी बारा वाजलेपासुन शनिवारी राञी बारा वाजेपर्यंत  पंढरपूर ला येणारे सर्व एस टी बस सेवा बंद करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.      मराठा समाजाचे शनिवारी पंढरपूर ते मुंबई अशी आक्रोश दिंडी निघणार आहे. या पार्श्वभुमिवर पंढरपूर शहरात कोरोनाच प्रादुर्भाव वाढु नयेत यासाठी हे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. याचबरोबर आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर परिसर, महाद्वार घाट, नामदेव पायरी, चौफाळा, पश्चिमद्वार परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात दोन पैक्षा अधिक व्यक्तिंना एकञ जमण्यास देखील मनाई करण्यात आली आहे .     

चुलत्याचे सराफ दुकान फोडुन पुतण्याच्या मोटारसायकवरुन चोरट्याने ठोकली धुम....

इमेज
  उपरी येथील प्रकार : चोरटे सीसीटिव्ही कॅमे-यात कैद... पंढरपूर / प्रतिनिधि :  उपरी ता. पंढरपूर येथे बुधवारी राञी अज्ञात चोरट्याने  सराफ दुकानाचे शटर उघडत चांदिचे दागिने लंपास केले. जाताना मोटारसायकलसह सीसीटिव्ही कॅमेराचे डिव्हिआर  घेवुन पोबारा केला. उपरी येथील नवनाथ नागणे यांच्या स्वामी समर्थ ज्वेलर्स चे शटर उघडुन चांदिचे दागिने लंपास केले. या दुकानातील सीसीटिव्ही कॅमेराचे डिव्हिआर देखील चोरट्यांनी लंपास केला आहे. जाताना  या सराफ दुकानदाराचे  पुतणे सोमनाथ नागणे यांची मोटारसायकल क्र  एम एम १३ सीजी ४९९८  याची देखील चोरी करण्यात आली. माञ  पेट्रोल संपल्याने दफनभुमी जवळ मोटारसायकल सोडुन चोरट्यांनी पोबारा केला.  ही घटना राञी तीन वाजणेच्या सुमारास घडली.  सराफ दुकानाची चोरी करणेचे अगोदर या चोरट्यांनी गावातीलच संस्कृती बिअरबार व परमिट रुमचे कुलुप तोडले. याठिकाणी असलेल्या सीसीटिव्हि कॅमेरा फिरवत चोरी करण्याचा प्रयत्न केला. माञ याठिकाणी ढाबा मालक व कामगार मुक्कामी असलेने त्यांना चोरी करता आली नाही.पो नि प्रशांत भस्मे, हवालदार मारुती दिवसे, पोहेकाॅ जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

पंढरपूर - कुर्डुवाडी महामार्गावर अपघात... एक ठार

इमेज
रोपळे येथे अपघात... चालकाचा जागीच मृत्यू... पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर - कुर्डुवाडी मार्गावरील रोपळे येथे ट्रक व ऊस वाहतुक टॅक्टरचा समोरासमोर अपघात झाला.  या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यु झाला असल्याची माहिती तालुका पो नि किरण अवचर यांनी दिली.  हा अपघात रविवारी पहाटे ३:३० वाजणेचे सुमारास घडला.  पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.         सध्या या महामार्गावरील अनेक ठिकाणी ठेकेदाराने पुल व साईटपट्टयांची कामे अर्धवट ठेवली आहेत.  यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमधुन होत आहे. मागील रविवारी दि २५ आक्टोबर रोजी देखील आढीव विसावा या ठिकाणी खराब रस्त्यामुळे ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला होता. याकडे माञ संबधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.