पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेशन दुकानातून मिळणार मोफत धान्य : तहसिलदार सुशील बेल्हेकर

इमेज
      पंढरपूर :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516  टन तांदूळ असे एकत्रित 869 टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 116 तर शहरात 30  असे एकूण 146 रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत 5 हजार 713 कार्डधारक असून 21 हजार 506 लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत 32 हजार 701 कार्डधारक असून 1 लाख 31 हजार 221 लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013  अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास  प्रतीकार्ड 15 किलो गहू 2 रुपये किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 2 रुपये दराने व 3 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी 2023 पासून अंत्योद्य योजनेतील  प्रत्येक कार्डधारकाला 15 किलो गहू 20 क

भंडीशेगाव येथे चोरी : पोलीस पथके तैनात

इमेज
  पंढरपूर :  भंडीशेगाव ता पंढरपुर येथील वासुदकर वस्ती  येथे अज्ञात चोरट्यांनी चार तोळे सोन्यासह रोख ७० हजारांची चोरी केली आहे. याबाबत  बाळासाहेब  सांळुखे यांनी गुन्हा दाखल केला असून चोरांच्या तपासासाठी पथके तैनात केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.   याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की,  10 जानेवारी रोजी रात्री 11/30 वा सुमारास साळुंखे यांचे कुंटुबीय घरातील सर्व खोल्यांचे दरवाजांना कडया न लावता नुसते पुढे करून  झोपले होते.  पहाटे 5 वा चे सुमारास नेहमी प्रमाणे सकाळी काम करण्यासाठी उठले असता  घरासमोरील पोर्चमध्ये लहान मुलीचे खोटे गळ्यातील पडलेले दिसले.  यानंतर घरातील खोलीकडे पाहिले असता  चोरी झालेचे समजले. घरातील चार तोळे सोने व चांदीचे पैजन व रोख 70 हजार असे एकुण 2 लाख 74 हजार 500 रुपयांची चोरी झाली आहे.  घटनास्थळी पो नि धनंजय जाधव यांनी भेट देवून तपासासाठी पथके तैनात केली आहेत.

सोशल मीडियावर अनोळख्या व्यक्तीसोबत संपर्क टाळा- सहा. पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात

इमेज
पंढरपूर :  २ जानेवारी  ते ०७ जानेवारी २०२३ या दरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे.  यानिमित्त पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने २ जानेवारी पासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.  पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे,  अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,   उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,  पो नि  मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.   अनवली येथील सतु कृष्णाकेनी विद्यालय  येथे सहाय्यक पोलीस  निरीक्षक आदिनाथ खरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, वापर करताना  घ्यावयाची दक्षता, आपली वैयक्तिक व खाजगी माहिती आवश्यकता नसल्यास शेअर करू नये. सोशल  मीडिया वरून देण्यात येणारे वेगवेगळे आमिषे यांना बळी पडू नये. सोशल मीडियाच्या बाबतीत सजगता  हाच सुरक्षेचा उपाय असल्याचे यावेळी विद्यार्थ्याना सांगण्यात आले. गुड टच व बॅड टच याबाबत माहिती  सांगितली. महिला व विद्यार्थीनी कोणत्याही व्यक्ती छेडछाड करीत असेल तर निर्भया पथकाला अथवा  पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याबाबत आवाहन केले. वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार नरळे व जगताप यांनी पंढरप