पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माजी महापौर मनोहर सपाटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

इमेज
  सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे वय 71 यांना पिडीत महिलेवर अनेक वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात अतिरिक्त सञ न्यायाधीश श्रीमती के.डी.शिरभाते यांनी अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केला.  याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेवर मनोहर सपाटे यांनी शारिरीक संबध ठेवले, तिने विरोध केल्यानंतर तुला कामावरुन काढून टाकीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन असे धमकावत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. तिची इच्छा नसतानाही तिचा राजीनामा घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले. अशा आशयाची फिर्याद पिडीतेने फौजदार चावडी पोलीसात दाखल केली होती. सदर सोलापुर सञ न्यायालयामध्ये मनोहर सपाटे यांनी अँड शशी कुलकर्णी यांच्यामार्फत अटकपुर्व जामीन अर्ज  दाखल केला होता. सदर प्रकरणाची सुनावणी अति.सञ न्यायाधीश श्रीमती के.डी.शिरभाते यांच्या समोर झाली.  सदरकामी अँड शशी कुलकर्णी  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन पोलीस स्टेशन येथे हजेरी लावण्याच्या अटीवर अ

उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’

इमेज
          नवरात्रोत्सवानिमित्त  महिलासांठी अभियान पंढरपूर :-  नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविले जात असून, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या वतीने  अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत गरोदर माता व 18 वर्षावरील महिलांची मोफत तपासणी व उपचार  करण्यात येणार असून, जास्ती-जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे,  आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेशकुमार माने यांनी केले आहे.   सदर अभियान उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. हे अभियान 26 सप्टेंबर ते  5  ऑक्टोबर 2022 या नवरात्रोत्सव कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.   या अभियानांतर्गत तज्ञांमार्फत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार मोफत करण्यात येणार असून, तालुक्यातील तसेच परिसरातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून हे अभिया

सामाईक झाड तोडून केला खून : आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

इमेज
    पंढरपूर न्यायालयाचा निकाल   पंढरपूर / प्रतिनिधी :  सामाईक चिलारीचे झाड तोडताना झालेल्या वादात आरोपींनी कुऱ्हाडीने घाव घालून मयत महिला विमल शंकर पवार यांचा खून केला होता.  तर त्यांचा मुलगा शरद पवार यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  याप्रकरणी पंढरपूर सत्र न्यायाधीश महेश लंबे यांनी आरोपी महेश मारुती पवार यास दोषी धरून त्याच्या उर्वरित जिवनाच्या नैसर्गिक अंतापावेतो आजन्म सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील शेरे वस्ती येथे दिनांक 26 मार्च 2017 रोजी सकाळी आठ वाजता आरोपी महेश पवार त्याचे वडील मारुती पवार, आई कुसुम पवार यांना चिलारीचे  झाड का तोडता असे विचारल्यावर मयत विमल पवार व त्यांचा मुलगा शरद पवार यास मारहाण केली होती.  या मारहाणीत विमल यांचा मृत्यू झाल्याने सांगोला पोलीस ठाण्यास भादवी कलम 302 307 337 201 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तत्कालीन तपास अधिकारी सपोनि भाऊराव बिराजदार यांनी आरोपी विरोधात दोषारोपञ  दाखल केले होते.  न्यायालयात सुनावणी दरम्यान 11 साक्षीदार तपासण्यात आले होते यानुसार पंढरपूर न्यायालयाने 22

पंढरपूरकरांवर चुकीचा विकास आराखडा लादण्याचा प्रयत्न कराल तर उद्रेक होईल :.मनसे नेते दिलीप धोत्रेंचा इशारा

इमेज
   विकासाला विरोध नाही पण जनतेला विश्वासात घ्या... पंढरपूर शहर प्रस्थावित विकास आराखड्याबाबत विचारविनिमय करणेसाठी रविवारी राञी चौफाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी, व्यापारी, जागरूक नागिरक उपस्थित होते. यावेळी बोलताना  मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की आमचा पंढरपूरच्या विकासाला विरोध नाही, पंढरपूरचा विकास होणे गरजेचे आहे पण यामध्ये जे जे नागरिक बाधित होणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे कसलेही नुकसान होऊ न देता पंढरपूर विकास आराखडा राबविण्यात यावा. जिल्हाधिकारी  सोलापूर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत मागील महिन्यात काशी विश्वनाथ येथे भेट देत  तेथील विकास कामाची पाहणी केली होती. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापुरात बैठक घेत विकास आराखड्याचे सादरीकरण केले.  वास्तविक ही बैठक पंढरपुरात होणे आवश्यक होते.  पंढरपूर शहरातील नागिरकांच्या माहितीसाठी पंढरपुरात बैठक व्हावी अशी मागणी करण्यात आली असता तसे आश्वासनही देण्यात आले. या आराखड्यात प्रास्तवित करण्यात आलेली अनेक कामे येथील जनतेची मते विचारात न घेता थोपण्यात आली आहेत. यामुळे अने

सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारणार : श्रीकांत शिंदे

इमेज
                               राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे पंढरपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला  वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर डिस्प्ले फॅब्रिकेशनचा होणारा प्रकल्प  गुजरात राज्यात गेला आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये 1 लाख 60 कोटींची गुंतवणूक व सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत गद्दारी करून गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प गुजरातला स्वाधीन केला  आहे. मग आपण महाराष्ट्राचे हित न पाहता  गुजरातचे हित जर पाहत असाल तर महाराष्ट्रातला तरुण हा कधीही सहन करणार नाही जर तुम्ही महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना जर रोजगार उपलब्ध करून देत नसाल तर त्या हातांना आपल्या विरोधात दगड घेण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठी आपण शिंदे सरकारविरोधात आक्रमक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक

लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपुर तालुक्यात पशुसंवर्धन विभाग सज्ज : प्रांताधिकारी गजानन गुरव

इमेज
  तत्काळ उपचारासाठी  10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथक         पंढरपूर :- लम्पी त्वचा आजार  हा गाई आणि म्हैस यासारख्या जनावरांमध्ये आढळून येत असून, हा आजार संसर्गजन्य असल्याने तो एका कडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, जनावरांच्या तत्काळ उपचारासाठी 10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये कोणतेही आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे असे, आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे पंढरपूर तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.भिंगारे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी.एम.जाधव, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात  जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली असून, पंढरपूर तालुक्यात या आजाराची लक्षणे असणारी जनावरे आढळ

भिमा नदीत तरुण वाहून गेला

इमेज
  पिराची कुरोली बंधा-यावर झालेली  गर्दी पंढरपूर/प्रतिनिधि : पिराची कुरोली ता पंढरपूर येथील बंधा-यावरुन २१ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सदर तरुणाचा  शोध घेतला जात असल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.   याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी ता पंढरपूर येथील   गजेंद्र उर्फ सज्जन संतोष गायकवाड वय 21  याने बंधा-यावरून नदीमध्ये उडी मारली.  त्या नंतर तेथील ग्रामस्थांनी शोधले असता तो अद्यापर्यंत सापडला नाही. सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने शोधण्यास अडथळा येत आहे. सदर तरुणाला शोधणेसाठी पो नि धनंजय जाधव, हवालदार ढोबळे, पोलिस नाईक पठाण, सुरवशे, सय्यद प्रयत्न करीत आहेत.

अवैध धंद्यावर पोलीसांची कारवाई ; १ लाख ८३ हजारांची दारु जप्त

इमेज
  अवैध दारुसह ताब्यात घेतलेला आरोपी, पो नि धनंजय जाधव व पंढरपूर ग्रामीण पोलीस कर्मचारी           पंढरपूर/प्रतिनिधी : पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ शत्रुघ्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला याने तिसंगी येथील  अजिंक्यतारा हॉटेलमध्ये व हॉटेलचे पाठीमागे असलेल्या शेवाळे यांचे घरातील खोलीमध्ये अवैद्य देशी - विदेशी दारुचा साठ्यावर पोलीसांनी कारवाई केली.  यामध्ये १ लाख ८३ हजारांची दारु जप्त केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.  याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, किंगफिशर बिअर, टुबर्ग बिअर, देशी दारु संत्रा, इंपिरीअल ब्यु, मँकडॉल नंबर 1 व्हीस्की, मँक़डॉल नंबर 1 रम, व्हाईटमिस्चिफ वोडका, ब्लेडर प्राईड व्हीस्की, ब्लँक डिलक्स. व्हीस्की, रँयल स्टँग व्हीक्सी, रोमानो वोडका, आँफिसर चॉईस व्हीस्की, डॉ.श्रीपुर ब्राँन्डी व्हीस्की आदी  1 लाख 83 हजार 780 रुपयांची अवैध दारु पोलीसांनी जप्त केली.  आरोपी बंडु भारत पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला यास ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलचे मालक नवनाथ शत्रुग्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला जि. सोलापूर याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. बेक

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळू विक्री करणा-या सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर ग्रामीण पोलीसांनी कारवाई करीत अटक केली असल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.  यातील आरोपी अशोक शिंगारे हे मांजरी ता. सांगोला गावचे माजी सरपंच असून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना वर्षभरापूर्वी जेवु घातल्याने हॉटेलच्या बिलाची काही दिवसापूर्वी जाहीर मागणी करून प्रसार माध्यमात खळबळ उडवून दिली होती. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, रविवार दि ११ सप्टेंबर रोजी सकाळी तिसंगी ता पंढरपूर येथे पांढ-या रंगाच्या पिकअपमधून अवैध वाळू खाली करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. तात्काळ याठिकाणी पोलीस गेले असता सदर पिकअप वाळू खाली करुन जात असताना चालक अशोक सुखदेव शिनगारे, तुषार राजेंद्र सलगरे दोघे  रा मांजरी तां सांगोला यांनी पोलीसांना धक्काबुक्की करुन जात असतानाच पोलीसांनी पकडले. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,