सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारणार : श्रीकांत शिंदे

                              

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे


पंढरपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला  वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर डिस्प्ले फॅब्रिकेशनचा होणारा प्रकल्प  गुजरात राज्यात गेला आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये 1 लाख 60 कोटींची गुंतवणूक व सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत गद्दारी करून गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प गुजरातला स्वाधीन केला  आहे. मग आपण महाराष्ट्राचे हित न पाहता  गुजरातचे हित जर पाहत असाल तर महाराष्ट्रातला तरुण हा कधीही सहन करणार नाही जर तुम्ही महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना जर रोजगार उपलब्ध करून देत नसाल तर त्या हातांना आपल्या विरोधात दगड घेण्याची वेळ येऊ देऊ नये यासाठी आपण शिंदे सरकारविरोधात आक्रमक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे.  

विशेष म्हणजे वेदांता व फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटी रूपयांची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटी रूपयांची सवलत दिली तरीही हा प्रकल्प जाणीवपुर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला याच्यामागे कोणाचे कारस्थान आहे हे तरूणांनी ओळखावे व त्यांना त्यांची जागा दाखवावी.

वेदांता ग्रुप व फॉक्सकॉनचा हा प्रकल्प जर गुजरातला जात असेल तर महाराष्ट्रातल्या तोंडातला घास आपण गुजरातला देत आहात असेच म्हणावे लागेल. जो प्रकल्प महाराष्ट्रात उभा होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 95 % तरतुदी पूर्ण केल्या असताना ही जर हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असेल तर आधी महाराष्ट्रातील तरुणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माफी मागितली पाहिजे. ज्या तरुणांना आपण रोजगार देऊ शकत नाही. हिंदुत्वाच्या नावावर आपण  उद्धवजी ठाकरे  यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच पद्धतीने हा महाराष्ट्रात उभा राहणारा प्रकल्प जर गुजरातला जात असेल तर ज्या 1 लाख ते दीड लाख तरुणांना रोजगार मिळणार होता त्या  तरुणांच्या पाठीत खऱ्या अर्थाने खंजीर खूपसण्याचे काम एकनाथ शिंदे साहेब आपण करत आहात असेच म्हणावं लागेल.  महाराष्ट्रात उभा राहणारा प्रकल्प हा महाराष्ट्रातच उभा राहिला पाहिजे यासाठी  एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात लढा उभा करणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.


.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई