भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

 

पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख  ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती

                                                   


              

 

            पंढरपूर :- जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  सोलापूर शहरासाठी पिण्याकरीता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून  पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव राहावे यासाठी भीमा नदी व निरा उजवा कालवा काठचा वीजपुरवठा बंद ठेवावा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या  तसेच पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली  असल्याचेही त्यांनी सांगितले.

              पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत. सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. या काळात भीमा नदी व निरा उजवा कालवा काठचा  वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून विद्युत मोटारी जप्त करण्यात येतील.  भीमा पाटबंधारे विभाग, निरा उजवा कालवा विभाग, वीज वितरण विभाग, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन यांनी संयुक्त पथक नदीकाठी व निरा उजवा कालव्याकाठी कार्यान्वित ठेवावे. पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने शेतीसाठी पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही  प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या आहेत. 

           तसेच संभाव्य पाणी टंचाई विचारात घेवून सर्व संबंधित विभागांनी पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. आरक्षित पाणी साठ्याचा अवैध उपसा होवू नये, यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही  प्रांताधिकारी  इथापे यांनी यावेळी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई