पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस चौकीतच लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई

इमेज
प्रातनिधिक चिञ   सोलापूर / प्रतिनिधी : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच घेताना सदर बजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर वय 34 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.  धक्कादायक बाब म्हणजे सदर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या रेल्वे टेशन पोलीस चौकीमध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ माजली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात तक्रारदार व त्यांच्या ओळखीच्या इसमांच्या गाड्या प्रवाशी वाहतुक करणेकरीता उभा असतात. या गाड्यांवर कोणतीही कारवाई न करणेसाठी उपनिरीक्षक प्रशांत श्रीरसागर यांनी मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी करीत १२ हजार स्विकारले. ही लाच रेल्वे पोलीस चौकीमध्येच स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप अधीक्षक संजीव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रकांत कोळी, शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम‌ सुरवसे‌ यांनी केल

सुपलीच्या व्यक्तीचा लातुर जिल्ह्यात खून ! एका महिलेसह दोघे पोलीसांच्या ताब्यात

इमेज
                      पंढरपुर / प्रतिनिधी : सुपली ता पंढरपूर येथील भानुदास जगनाथ माळी वय ६० यांचा  लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात खून झालेने  एकच खळबळ माजली आहे. भानुदास माळी हे २८ मे रोजी दुपारी १२.३० हे पंढरपुरातून    पैसे घेवून येतो म्हणून  घरातून गेले होते. माञ  ते परत न  आलेने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला. माञ ते सापडले नसलेने नातेवाईकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवलेबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल  होताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शानाखाली पो नि धनंजय  जाधव यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली. भानदास माळी' हे ज्यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेले होते, त्या व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी  केली आणि एका महिलेसह एका तरुणास निलंगा पोलिसांनी ताब्यात  घेत अटक केली आहे.  निलंगा येथील पोलिसांनी अटक केलेली महिला व पुरुष याबाबत निलंगा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार निलंगा लातुर ते जहीराबाद मार्गावरील पानचिंचोलीवर येथे ३० मे रोजी रोडच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले. लातूर जिल्हा पोलीस प्रमुख निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पो नि बाळकृष्ण

अबब...! १४ वर्षाच्या मुलीचा लावला विवाह २०० लोकांवर गुन्हा दाखल

इमेज
  खर्डी येथील घटना : पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई पंढरपूर / प्रतिनिधी : खर्डी ता पंढरपूर येथील चव्हाण मळा येथे केवळ १४ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचा बालविवाह करण्यात आला. याची माहिती मिळताच पंढरपुर तालुका पोलीसांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. याचबरोबर या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह लग्नास उपस्थित असणारे सुमारे २०० लोकांविरोधात ग्रामसेवक भगवान कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.  पंढरपूर तालुक्यात कोठेही बालविवाह होत असतील तर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, खर्डी येथे बालविवाह झाल्याची माहिती पोलीसांना समजताच ग्रामसेवक भगवान कुलकर्णी व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवरी मुलगी ही १८ वर्षापैक्षा कमी वयाची असल्याचे निदर्शनास आले. नवरी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देवू लागले. मुलीचा जन्मदाखला प्राप्त केलेवर सदरची मुल