अबब...! १४ वर्षाच्या मुलीचा लावला विवाह २०० लोकांवर गुन्हा दाखल

 खर्डी येथील घटना : पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई



पंढरपूर / प्रतिनिधी : खर्डी ता पंढरपूर येथील चव्हाण मळा येथे केवळ १४ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचा बालविवाह करण्यात आला. याची माहिती मिळताच पंढरपुर तालुका पोलीसांनी घटनास्थळी जावून कारवाई केली. याचबरोबर या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेवाचे नातेवाईक, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी, ग्रामपंचायत सदस्य यांचेसह लग्नास उपस्थित असणारे सुमारे २०० लोकांविरोधात ग्रामसेवक भगवान कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. 

  • पंढरपूर तालुक्यात कोठेही बालविवाह होत असतील तर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे.

याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, खर्डी येथे बालविवाह झाल्याची माहिती पोलीसांना समजताच ग्रामसेवक भगवान कुलकर्णी व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवरी मुलगी ही १८ वर्षापैक्षा कमी वयाची असल्याचे निदर्शनास आले. नवरी मुलीच्या वडिलांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देवू लागले. मुलीचा जन्मदाखला प्राप्त केलेवर सदरची मुलगी ही केवळ १४ वर्षे ८ महिन्याची असल्याचे स्पष्ठ झाले. यामुळे पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि मिलींद पाटील, सपोनी आदीनाथ खरात यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका योगिराज खिलारे करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई