पोस्ट्स

#पंढरपूर अर्बन बॅक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पँनेलचा जल्लोष

इमेज
   पंढरपूर-  दि पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी समविचारी गटाचे सर्व अठरा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक पी.सी.दुरगुडे यांनी दिली. या निर्णयानंतर सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करीत ङ्गटाक्याची अतिषबाजी केली. पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन करून याव्दारे सर्व सतरा जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीची प्रक्रीया पूर्ण झाली व यावर आज गुरूवारी सकाळी निर्णय देण्यात आला. सहायक निबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये केवळ सत्ताधारी गटातील अठरा उमेदवारांची नावे होती. निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक असणारी प्रक्रीया विरोधी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी पूर्ण केली नसल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उमेदवाराची पंढरपूर अर्बन बँकेत एक लाख रूपयाची ठ...