पोस्ट्स

सबजेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून कायापालट

इमेज
    पंढरपूर :- पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पंढरपूर सबजेलची स्वच्छता व  रंगरगोंटी तसेच कैद्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थेसह आदी आवश्यक कामे लोकसहभातून केली असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली.              पंढरपूर सबजेलमध्ये 7 कारागृह कोठड्या व दोन व्हरांडे  आहेत. या ठिकाणच्या  आतील व बाहेरील भिंतींना रंगरंगोटी, दरवाजांना रंग, जुन्या लाकडी फर्निचरमधून नवीन खुर्च्या व बाकडे तयार करण्यात आली. तसेच कोठडीतील आरोपीना स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.  कोठडीत कैद्यांना सकारात्मक उर्जा मिळावी त्यांच्या आचरणात बदल व्हावा यासाठी समोरील भिंतीवर देवदेवतांचे  भिंती चित्र तसेच स्वच्छ हवा मिळावी यासाठी तुळशी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पावसामुळे दिवसांत कोठडीच्या भिंती ओल्या झाल्यावर विद्युत प्रवाह भिंतीत उतरण्याची श्यकता असल्यामुळे  जुन्या झालेले विद्युत उपकरणे बदलून त्याठिकाणी नविन विद्युत उपकरणे टाकण्यात आली. असेही नायब...