पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपरीतील दत्तात्रय नागणे यांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश

इमेज
    प्रतिनिधी पंढरपूर /- सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा भाळवणी गटामध्ये उपरी गाव भेट दौरा असताना उपरीचे माजी सरपंच दत्तात्रय माणिकराव नागणे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला. एकेकाळी भालके व काळे गटात प्रामाणिकपणे काम केलेल्या सहकाऱ्याला आज अभिजीत पाटलांची ओढ लागलेने  कारखाना निवडणुकीत रंगत वाढली आहे.  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काळे भालके गटाचे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराज होऊन आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विश्वासावर सभासदांनी विश्वास ठेवला असून त्यांना चांगला ऊस दर देता आला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने देखील विठ्ठल प्रमाणे ऊसदर देण्यात येईल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यापुढे विठ्ठल प्रमाणे सहकार शिरोमणी ला दर दिला जाईल या अनुषंगाने काळे भालके गटातील अनेक पदाधिकारी अभिजीत पाटील गटात येण्यास उत्सुक आहेत अशी सर्वत्र चर्चा तालुक्यात होताना

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :   वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सोमवारी अचानक वादळी वारे व अवकाळी पा ऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे  नुकसान झालेची माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्कंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे.  सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपूर्ण पत्रे उडून झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजलेले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान  झालेले आहे.  विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्कंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे.  कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे उडून गेलेने नुकसान झालेले आहे. आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गेलेले आहेत. इंजिनिअरींग ऑफीस, शुगर हाऊस, टबाईन,

अखेर कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांच्या अर्जावरील निकाल जाहीर

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :  भाळवणी ता पंढरपूर येथील वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.  प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावरच आक्षेप घेतलेने  प्रमुख नेत्यांची धाकधुक वाढली होती. अखेर आज सोमवारी  निवडणुक निर्णय अधिका-यांनी निकाल जाहीर केला असून  कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. यामुळे ही निवडणुक चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. संचालक योगेश ताड यांनी बी पी रोंगे यांच्यावर भागाच्या प्रमाणात ऊस गाळपास आला नसल्याचा आक्षेप घेतला होता तर धनंजय काळे यांनी चेअरमन कल्याणराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेतला होता. तर दिपक पवार यांनी देखील भागाच्या प्रमाणात ऊस  गाळपास आला नसल्याचा आक्षेप होता. अखेर या प्रमुख उमेदवारांवरील हरकती फेटाळण्यात आल्या असून उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.