अखेर कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांच्या अर्जावरील निकाल जाहीर

 


पंढरपूर / प्रतिनिधी :  भाळवणी ता पंढरपूर येथील वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.  प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावरच आक्षेप घेतलेने  प्रमुख नेत्यांची धाकधुक वाढली होती. अखेर आज सोमवारी  निवडणुक निर्णय अधिका-यांनी निकाल जाहीर केला असून  कल्याणराव काळे, डाँ बी. पी. रोंगे, अँड दीपक पवार यांचे उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. यामुळे ही निवडणुक चुरशीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.




संचालक योगेश ताड यांनी बी पी रोंगे यांच्यावर भागाच्या प्रमाणात ऊस गाळपास आला नसल्याचा आक्षेप घेतला होता तर धनंजय काळे यांनी चेअरमन कल्याणराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेतला होता. तर दिपक पवार यांनी देखील भागाच्या प्रमाणात ऊस  गाळपास आला नसल्याचा आक्षेप होता. अखेर या प्रमुख उमेदवारांवरील हरकती फेटाळण्यात आल्या असून उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई