ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर
अखेर ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर... पंढरपूर / प्रतिनिधि : राज्यातील मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत कालावधी संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे. नवीन वर्षात १५ जानेवारी रोजी मतदान होणार असलेने निवडणुका जाहीर झालेल्या गावांमध्ये राजकीय रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.