पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन

इमेज
विश्व वारकरी सेनेचे आमरण उपोषण स्थगित गुन्हे मागे घेण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी दिले आश्वासन पंढरपूर / प्रतिनिधि  वारकरी संप्रदायाला भजन कीर्तनास विना अट परवानगी द्यावी , राज्यातील मंदिरे खुली करावीत आणि संत नामदेव महाराजांच्या वंशजावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पंढरपूरमध्ये कालपासून सुरू केलेले  आमरण उपोषणा आज प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर स्थगित करण्यात आले . प्रांताधिकारी सचिन ढोले विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप जगन्नाथ महाराज देशमुख, हभप गणेश महाराज शेटे, हभप तुकाराम महाराज चवरे आदीमध्ये सविस्तर चर्चा होऊन मागण्याचे निवेदन शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला . महाद्वार काल्या दिवशी संत नामदेवांच्या वंशज व मदन महाराज हरिदास यांचेवर दाखल केलेला गुन्हा देखील मागे घेण्यास प्रशासनाने तयारी दाखवल्यानंतर तोडगा निघाला .         वारकरी संप्रदायाच्या भावनांचा विचार होत नसल्याने तात्काळ मागण्या मान्य होत नसल्याने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील २९ जिल्ह्यातुन १ लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतील असा इशारा विश्व वारकरी

आ भारत भालकेंनी दिला‌ ३० लाखांचा निधी...

इमेज
कोविड रुग्णालयासाठी आ भारत भालकेंनी दिला‌ ३० लाखांचा निधी... आरोग्यमंञ्यानी आरोग्य सुविधा पुरवण्याचा दिला शब्द पंढरपूर / प्रतिनिधि जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला.  यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  यावर नियंञण मिळवण्यासाठी  गुरुवारी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पंढरपूर मध्ये आढावा बैठक घेतली.  या बैठकीत आ भारत भालके यांनी १२ आॅक्सिजन मशिन खरेदी करणेसाठी ३० लाखांचा निधी  दिला.        पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर मध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. याची घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी   करणार आहेत. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी  शहरातील सहा खाजगी हास्पिटल ताब्यात घेण्यात आले आहेत.  या रुग्णांवर तात्काळ उपचार मिळणेसाठी व मृत्यु दर कमी करणेसाठी  आॅक्सिजन मशिनची गरज असल्याचे या बैठकीत डाॅक्टरांनी सांगितले. यावर तात्काळ आ भारत भालके यांनी ३० लाखांचा निधी दिला. याचबरोबर या बैठकीत आ भालके यांनी आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्
इमेज
पंढरपूर मध्ये नवीन २१ रुग्ण...   शहर व तालुक्यातील १८५ पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार... पंढरपूर / प्रतिनिधि जुनच्या शेवटच्या आठवड्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने जोरदारपणे शिरकाव केला आहे. यामध्ये दररोज वाढ होत असुन मंगळवारी २१ रुग्ण आढळले आहेत.    तालुक्यातील बोहाळी, देगाव, नारायण चिंचोली, भंडिशेगाव या नवीन चार गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  आजपर्यंत शहर व तालुक्यात एकुण २३३ रुग्ण आढळले असुन यापैकी ४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १८५ रुग्णांवर उपचार सुरु असुन यामध्ये शहरातील १३५ व तालुक्यातील ४९ रुग्णांचा समावेश आहे.  मंगळवारी नवीन सापडलेले २१ रुग्ण खालीलप्रमाणे
इमेज
लाॅकडाऊनच्या कालावधीत सहा घरफोड्यातील चोरटे जेरबंद... पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी पंढरपूर / प्रतिनिधि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने मार्चपासुन लाॅकडाऊन सुरु केला आहे. पोलीस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत पंढरपूर शहरात पाच व तालुक्यात एक असे सहा ठिकाणी घरफोडी करणारे चोरट्यांना जेरबंद करीत १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त  केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी दिली.      सागर कृष्णात हराळे रा. झाखले ता पन्हाळा जि कोल्हापुर, लखन कालिदास काळे रा जुना कोर्टाच्या पाठीमागे व इतर दोन आरोपींनी  पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण   तीन  ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला आहे.  या आरोपीकडुन  २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.    शहरातील लोणार गल्ली येथील संदेश नवञे यांच्या घरातील तीन तोळ्याचे सोन्यांचे गंठण चोरलेप्रकरणी सौरभ उर्फ अक्षय कुमार नवञे यास अटक केली आहे. याचबरोबर तिरंगा नगर येथील ६५ वर्षीय रंजना संभाजी जाधव यांच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांना हिसका मारुन पोबारा केला. याप्रकरणी शंकर उर्फ प

उपरी ग्रामस्थांनी हनुमानास घातला दुधाचा अभिषेक...

इमेज
उपरी ग्रामस्थांनी  हनुमानास घातला दुधाचा अभिषेक... पंढरपूर / प्रतिनिधि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्चपासुन राज्यात लाॅकडाऊन सुरु आहे.   याचाच फायदा घेत  खाजगी दुध संस्थानी प्रतिलिटर  केवळ १६ ते १८ रुपये दर देत आहेत. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर दुध बंद आंदोलन पुकारले आहे.       या आंदोलनास राज्यभर प्रतिसाद मिळत असुन उपरी ता पंढरपूर येथील ग्रामस्थांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला.   ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिरात दुधाचा अभिषेक घालत अनोखे आंदोलन केले. यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक विलास जगदाळे, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन पै साहेबराव नागणे, माजी तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ आसबे, चंद्रकांत जाधव, सुरेश नागणे, अमुल डेअरीचे चेअरमन शशीकांत मोहिते, सतीश नागणे, राजाभाऊ नागणे, सुधाकर जाधव, सदाशिव मुळे, बबन नागणे, माऊली नागणे, केशव सुरवसे, तानाजी नागणे, रविंद्र नागणे, उमेश नागणे, अनिल नागणे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
आज १३ रुग्णांची वाढ पंढरपूर / प्रतिनिधि शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात नवीन १३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आजपर्यंत शहर व तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३१ वर पोहचली आहे. आज सापडलेले नवीन‌ रुग्ण खालीलप्रमाणे
इमेज
कोरोना बाधित संपर्कातील  व्यक्तींना क्वारंटाईन  करा    उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची सूचना     पंढरपूर./ प्रतिनिधि पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाययोजनांमध्ये वाढ करावी. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध घेवून त्यांना तात्त्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करुन  त्यांची  कोरोना चाचणी  घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.      पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत बाबत नवीन भक्त निवास येथे बैठक घेण्यात आली . बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, उप कार्यकारी अभियंता हनुमंत बागल, न.पा चे उपमुख्य अधिकारी  सुनिल वाळुंजकर,  डॉ.सरोदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना. ढोले  म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व
इमेज
पंढरपूरच्या तहसिलदारांची फेसबुकवर बदनामी  : सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल पंढरपूर / प्रतिनिधि पंढरपूर च्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्याबाबत बदनामी होईल असा मजकूर फेसबुकवरून व्हायरल केल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याच्याविरुद्ध पंढरपूर शहर  पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून डॉ. वैशाली वाघमारे या कार्यरत आहेत. 15 जुलै 2020 रोजी पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण याने कसलाही अधिकार नसताना व कसलीही खातरजमा न करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवरून व्हायरल केली. बदनामी होईल अशा या मजकुराची दखल घेऊन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सागर चव्हाण याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गाडेकर पुढील तपास करीत आह
इमेज
पंढरपूरने‌ पार केली‌ शंभरी.... आज नवीन ३० रुग्णांची भर... एकुण ११८  रुग्णांपैकी ३९ रुग्णांना डिचार्ज पंढरपूर / प्रतिनिधि कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत गुरुवारी शहर व तालुक्यात  तब्बल ३० रुग्ण वाढले आहेत. यामुळे एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११८ वर पोहचली आहे.  यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव‌ वाढत असल्याने चिंता वाढली आहे.      माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे ११८ पैकी ३९ रुग्ण ठणठणीत झाले असुन त्यांना डिचार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील दोन रुग्ण मयत झाले असुन सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत पंढरपूर शहरात ८२ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले असुन यापैकी २ मयत तर  २२ बरे झाले असुन ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात आजपर्यंत २८ रुग्ण सापडले असुन ११ बरे झालेने १७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याचबरोबर इतर तालुक्यातील ८ रुग्ण असुन यांचे पंढरपूर कनेक्शन आहे. यापैकी ६ बरे झाले असुन २ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  गुरुवारी शहरातील, महापुर चाळ संतपेठ,, घो

पंढरपूर मध्ये आज नवीन २४ रुग्ण

इमेज
पंढरपूर मध्ये आज नवीन २४ रुग्ण एकुण ८८ रुग्णांपैकी २९ रुग्णांना डिचार्ज पंढरपूर / प्रतिनिधि कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आज‌ शहर व तालुक्यात  तब्बल २४ रुग्ण वाढले आहेत. यामुळे एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली आहे.      माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे ८८ पैकी २९ रुग्ण ठणठणीत झाले असुन त्यांना डिचार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील दोन रुग्ण मयत झाले असुन सध्या ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  काल मंगळवार दि १४ जुलै सायंकाळी ६ वाजलेपासुन आज बुधवार १५ जुलै सायंकाळी ६ वाजलेपर्यंत वाढलेले नवीन २४ रुग्ण खालीलप्रमाणे

भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन यावे : जयंत पाटील

इमेज
महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही :  जयंत पाटील भाजपचा आमदार राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येणार नाही पंढरपूर / प्रतिनिधि सध्या राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडुन करण्यात येत आहे. माञ महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. येथील तीन पक्षाचे सरकार पाच वर्षे पुर्ण करेल. सध्या  राज्यातील भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येण्याची शक्यता नाही. असा टोलाही जलसंपदामंञी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.       मंगळवारी   राष्टवादी पक्षाच्या बैठकीसठी ते  खाजगी हेलिकाॅप्टरने पंढरपूर मध्ये आले असता पञकारांशी बोलत होते.  यावेळी पालकमंञी    दत्तामामा भरणे, आ भारत भालके, आ बबनराव शिंदे,   आ यशवंत माने, माजी आ राजन पाटील,  बळीराम काका साठे, माजी आ दिपक आबा साळुंखे, युवराज पाटील,   तालुकाध्यक्ष दिपक पवार,  शहराध्यक्ष सुधीर भोसले,  संदिप मांडवे आदी उपस्थित होते.    पुढे बोलताना‌ ते म्हणाले कि,   राज्यात कोरोनावर नियंञण आणणेसाठी काही शहरात पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येत आहे. लाॅकडाऊन लावायची काही हौस नाही. प्रशा
इमेज
लग्नाला परवानगी, मग गोंधळाला का नाही? आर्थिक मदतीची मागणी पंढरपूर. प्रतिनिधी : शासन काही अटी घालून लग्नाला परवानगी देते मग लग्नानंतर घालण्यात येणाऱ्या गोंधळाला का परवानगी देत नाही असा सवाल गोंधळी संघटनेचे अध्यक्ष कालिदास सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध कार्यक्रमावर निर्बंध घातले आहे आहेत. अनलॉक सुरु झाल्यापासून काही बंधने हटविण्यात येत असली तरी सार्वजनिक ठरत असलेल्या अनेक कार्यक्रमाना आजही परवानगी दिलेली नाही. लग्नसोहळा तसेच अंत्यसंस्कारालाही गर्दीच्या मर्यादेची अट घातलेली आहे. सभा, करमणुकीचे कार्यक्रम अशा ठिकाणी गर्दी होत असते त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात येत नाही परंतु यामुळे लोककलावंत अडचणीत आलेले असून त्यांचे आर्थिक गणित पूर्ण कोलमडून गेलेले आहे. याच पार्श्वभूमीवर  सोमवारी पंढरीत एक पत्रकार परिषद घेऊन लोककलावंतांनी आपली व्यथा मांडली.       कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिन्यापासून तमाशा कलावंतांना आपल्या कलेपासून दूर  आहे, कला हेच उपजीविकेचे साधन असताना आणि कला सादर करता येत नसल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ
इमेज
पंढरपूर तालुक्याला कोरोनाचा झटका...! पुन्हा  वाढले ९ रुग्ण! एक सरपंचही कोरोनाच्या विळख्यात : बाधितांची  संख्या गेली ६४ वर ! पंढरपूर (प्रतिनिधि) : पंढरपुर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव हॉट असतानाच काल रात्री मोठा झटका बसला असून एकदम ९ रुग्ण पॉझीटीव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यात एकाच कुटुंबातील पाच  तर आणखी  तीन जण  बाधित आहेत. तालुक्यातील एक सरपंचाची कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.       पंढरपूर तालुका कोरोनमुक्त राहील असे वाटत असतानाच एका शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे तो पंढरपूर शहरात घुसला आणि तालुकाभर तो आता मुक्तपणे पाय पसरत आहे. काळ  सोमवारी एका दिवसांत तब्बल ९ रुग्णाची भर पडली असून आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. पंढरपूर शहरात ८ तर तालुक्यात १ अशा नव्या ९ रुग्णाची नोंद झाली आहे. शहराच्या महापूर चाळीत एकाच कुटूंबातील पाच जण तर अन्य तिघांनाही  कोरोनाची बाधा झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका गावातील सरपंचालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एकंदर परिस्थिती पाहता आता संपूर्ण तालुक्याचीच चिंता वाढीस लागली असून ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उ