भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन यावे : जयंत पाटील



महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही :  जयंत पाटील


भाजपचा आमदार राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येणार नाही


पंढरपूर / प्रतिनिधि

सध्या राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडुन करण्यात येत आहे. माञ महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. येथील तीन पक्षाचे सरकार पाच वर्षे पुर्ण करेल. सध्या  राज्यातील भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येण्याची शक्यता नाही. असा टोलाही जलसंपदामंञी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 
     मंगळवारी   राष्टवादी पक्षाच्या बैठकीसठी ते  खाजगी हेलिकाॅप्टरने पंढरपूर मध्ये आले असता पञकारांशी बोलत होते.  यावेळी पालकमंञी    दत्तामामा भरणे, आ भारत भालके, आ बबनराव शिंदे,   आ यशवंत माने, माजी आ राजन पाटील,  बळीराम काका साठे, माजी आ दिपक आबा साळुंखे, युवराज पाटील,   तालुकाध्यक्ष दिपक पवार,  शहराध्यक्ष सुधीर भोसले,  संदिप मांडवे आदी उपस्थित होते.
   पुढे बोलताना‌ ते म्हणाले कि,   राज्यात कोरोनावर नियंञण आणणेसाठी काही शहरात पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येत आहे. लाॅकडाऊन लावायची काही हौस नाही. प्रशासनाच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे. 
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी हे सरकारमध्ये असतानाही यांनी वाढीव विजबिलासंदर्भात होळी‌ केली. या पञकारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, शेतक-यांचे प्रश्न कोणही विचारु शकतात.   हे सरकार शेतकरी हिताचेच निर्णय घेत आहे.  


*मुख्यमंञी उध्दव ठाकरे हे देखील आषाढीच्या महापुजेला हेलिकाॅप्टरने न येता कारने आले पण तुम्हि हेलिकाॅप्टरने आला या प्रश्नावर ते म्हणाले कि, मी दुसरे ठिकाणी चाललो होतो... यावेळी मला लिफ्ट मिळालेने मी आलो हेलिकॉप्टर माझे नाही*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई