पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंढरपूरकरांना दिलासा : १४७१ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत

इमेज
प्रशासनाचे योग्य नियोजन अन नागरिकांचे सहकार्य पंढरपूर / प्रतिनिधि : जुन महिन्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनाला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे तब्बल १४७१ रुग्ण ठणठणीत बरे होवुन घरी परतले आहेत. शहर व तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९% झालेने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.         मे  महिन्यापासुन तालुक्यात  पहिला रुग्ण सापडलेने एकच खळबळ उडाली होती. यावेळी देखील प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे एक महिन्यात आतच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. माञ जुनच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली होती.      आज अखेर पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण २१३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी १४७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असुन ६१९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी शहरातील ३४५ व तालुक्यातील २७४ रुग्णांचा समावेश आहे. याचबरोबर आजपर्यंत ४० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.     प्र

अन परिचारकांच्या सच्चा कार्यकर्त्याचेही निधन

इमेज
पंताबरोबरच सच्चा कार्तकत्याचेही कोरोनाने निधन... पंढरपूर / प्रतिनिधि : सहकारातील डाॅक्टर सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले. याचबरोबर त्यांचे सच्चा कार्यकर्ते, परिचारक गटाचे एकनिष्ठ शेगाव दुमाला‌ ता पंढरपूर येथील माजी सरपंच अभिमन्यु प्रल्हाद आटकळे यांचेही मंगळवारी सकाळी सहा वाजता निधन झाले.      अभिमन्यु उर्फ तात्या यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर सोलापूरातील खाजगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शेगाव दुमालाचे माजी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले.  जुन्या पिढीतील परिचारकांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणुन त्यांची ओळख होती.     नेत्या पाठोपाठ एकनिष्ठ कार्यकर्त्याचे देखील कोरोनाने निधन झालेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे

सहकारातील डाॅक्टर हरपले....

इमेज
माजी आ सुधाकरपंत परिचारक यांचे निधन : सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पंढरपूर / प्रतिनिधि:  अनेक बंद पडलेले साखर कारखाने  व तोट्यात असलेले परिवहन महामंडळ फायद्यात आणलेले सहकारातील डाॅक्टर माजी आ सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले.  माजी आमदार,  सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता  निधन झाले. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आ प्रशांत परिचारक यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांच्या निधनाने पंढरपूर शहर व तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात  शोककळा पसरली आहे. परिचारक यांनी तब्बल २५ वर्षे पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.  याचबरोबर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.  त्यांच्या कार्यकाळात तोट्यात असलेले महामंडळ त्यांनी फायद्यात आणले. याचबरोबर  सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या श्रीपुर येथील कारखाना विकत घेवुन सध्या व्यवस्थित चालवत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस दर देणारा

प्रामाणिक कामाची दखल : सचिन ढोले यांना सवोत्कृष्ठ उपजिल्हाधिकारी पुरस्कार घोषित

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांशी समन्वय ठेवत  नियमाप्रमाणे काम करणारे अधिकारी अशी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची ओळख आहे. मागील चार महिन्यापासुन कोरोनाच्या संकटात देखील  शासनाच्या नियमाप्रमाणे काम करीत प्रांताधिका-यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपुलकीची भावना  निर्माण केली आहे.  याचीच दखल घेत प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने " सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी" हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला.  नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी प्रांताधिकारी यांचा सत्कार केला. भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच महसूल दिन यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.  प्रांताधिकारी सचिन ढोले गेल्या अडीच वर्षापासून पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट महसूल प्रशासन तसेच पं

टाकळीच्या सरपंचाना दणका....

इमेज
टाकळीच्या सरपंचांना आयुक्तांचा दणका !    अपात्रतेची कारवाई !!  प्रदीर्घ काळ चालला होता लढा ! पंढरपूर, प्रतिनिधी :   टाकळी ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त ठरलेल्या सरपंचाला  दणका  बसला आहे. सरपंच नूतन उद्धव रसाळे यांना सरपंचपदावरून काढून टाकण्याचा आदेशा सोबतच सदस्य अपाञेची कारवाई  पुणे  विभागीय आयुक्तांनी केलेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  पंढरपूर शहरा लगत असलेल्या  टाकळी ग्रामपंचायतीमध्ये पूर्णपणे सावळा गोंधळ सुरु होता.  अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार असे गंभीर स्वरूपाचे आरोप घेऊन परमेश्वर देठे, महादेव देठे हे गेल्या काही वर्षांपासून लढा देत होते. अत्यंत गंभीर प्रकरण असूनही केवळ तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते परंतु सरपंचावर कारवाई व्हावी अशी मागणी परमेश्वर देठे आणि महादेव देठे यांनी प्रशासनाकडे केली होती. सबळ पुरावे जमा करून ते प्रशासनाकडे दिले होते. हे प्रकरण अखेर पुणे विभागीय आयुक्तापर्यंत पोहोचले आणि या प्रकरणाचा निकाल  लागला.   लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर सार्वत्रिक  निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून  आमदार भारत भालके  गटाच्या  सौ नूतन रसाळे  या  निव

प्रशासनाने दिला पंढरपूरकरांना विश्वास....

इमेज
रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त सहभाग पंढरपूर / प्रतिनिधि : जुन महिन्यापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या पंढरपूर शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व  पाॅझिटिव्ह रुग्णांना अलग करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान पंढरपूर मध्ये संचारबंदी केली आहे. या संचारबंदीचे सध्या कडकपणे अंमलबजावणी सुरु असली तरी प्रशासकीय अधिका-यांनी पंढरपूर वासियांची मने जिंकली आहेत. यामुळेच सध्या शहरातील नागरिक अॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी स्वत:हुन पुढे येत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.   प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी सर्व शासकीय यंञणांमध्ये समन्वय ठेवला आहे. यामुळेच नगरपालिका, पंचायत समिती, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी एकदिलाने काम करत आहेत.     पाॅझिटिव्ह रुग्णांना लक्षणे जाणवत नसतील तर संबधित रुग्णांना होम‌ काॅरनटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  यामुळेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्यासाठी मनिषा नगरमध्ये नागरिकांनी रांग लावली आहे. प्रांताधिकारी स

संचारबंदीमध्ये पंढरपुरात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार : जिल्हाधिकारी

इमेज
जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा        -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन                 सोलापूर, / प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह आसपासच्या काही गावात 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.           तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागरिकांच्या हितासाठी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा आणि दूध वितरण सुरू राहणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. हे काम करणाऱ्या पथकांना सहकार्य करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्यावर इलाज करणे सोयीस्कर होणार

अपेक्स व गॅलेक्सी हास्पिटल च्या ९ कर्मचारेंवर गुन्हा दाखल

इमेज
पंढरपूर प्रशासनाची कठोर कारवाई.... पंढरपूर / प्रतिनिधी सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन उपाययोजना करत असले तरी  रुग्ण वाढत असलेने अखेर ७ ते १३ आॅगस्ट दरम्यान संचारबंदी करण्यात येणार आहे.    रुग्णांवर तात्काळ उपचार मिळणेसाठी शहरातील खाजगी हाॅस्पिटल प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. माञ या हाॅस्पिटलमधील कर्माचारी कामावर येत नसलेने अखेर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी या कर्मचारेंवर कारवाई सुरु केली आहे.  आज. अपेक्स व गॅलेक्सी हाॅस्पिटलच्या ९ कर्मचारेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अपेक्स हाॅस्पिटलच्या दोन कर्मचारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  शहरातील डाॅक्टर व कर्मचारेंनी रुग्णावर उपचार करावेत.  कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला अथवा कामावर येण्यास टाळाटाळ केल्यास संबधित कर्मचारेंसह डाॅक्टरांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

संचारबंदीमध्ये पंढरपूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे

इमेज
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन             सोलापूर, / प्रतिनिधि:  पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे ,  या काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी विनाकारण शहरात येणे टाळावे. वैद्यकीय सेवा ,  औषध दुकाने ,  दूध वितरण याशिवाय कोणतीही दुकाने चालू राहणार नाहीत. आपल्या आसपास ,  घरातील व्यक्ती आजारी असेल तर याची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह असेल तर रूग्णाला त्वरित विलगीकरणात ठेवता येईल. शहरातील नागरिकाव्यतिरिक्त इतरांना विनाकारण प्रवेश मिळणार नाही. पंढरपूर शहरातून जाण्यास बंदी असली तरी शहराच्या बाह्य वळण रस्त्याने प्रवाशांना जाता येणार आहे. नागरिकांनी घरी असले तरी मास्कचा वापर करावा ,  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे ,  वेळोवेळी हात धुण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहनही पोलीस अधिक्

महाराष्ट बॅकेकडुन शेतक-यांची अडवणुक ; संतप्त शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधि यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने सध्या शेतकरी पेरणी व ऊस लागवड करत आहेत. माञ पेरणीसाठी शेतक-यांना महाराष्ट बॅक पिक कर्ज देत नसल्याने संतप्त शेतक-यांनी बुधवारी पंढरपूर येथे बोंबाबोंब आंदोलन केले.      पंढरपूर येथील   बँक ऑफ महाराष्ट्र  शाखा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा संदर्भात अडवणूक करत आहे.   केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना विविध योजनेद्वारे कर्ज मिळत नाही. म्हणून  बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.  यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर  जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके, नितीन गावडे, तानाजी सोनवले, औदुंबर सुतार, सर्जराव शेळके,  सचिन शिंदे, पोपट सुरवसे, दिलीप नागणे,   जनहित शेतकरी संघटनेचे क्षीकांत नलवडे, सचिन आटकळे, राजाभाऊ साळवे, रमेश लंगोटे आदी उपस्थित होते.

राहुल जगताप यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

इमेज
  पंढरपूर  : वांगी नं. १ (ता. करमाळा) येथील पै. राहुल जगताप यांची कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या तालुका प्रमुखपदी निवड झाली. निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष पै. गणेश मानुगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. यावेळी कुस्ती-मल्लविद्या पै. सोमनाथ चव्हाण, राहुल वाघमोडे, कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे आदींसह कुस्तीपटू उपस्थित  होते. पै. राहुल आबा जगताप हे पुर्वी शिवनेरी तालीम अकलूज येथे वस्ताद कै. दत्ता आप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. राहुल जगताप यांचा स्वभाव अत्यंत सरळमार्गी, स्पष्ट, एखाद्या होतकरूच्या मागे थांबणारे त्यामुळे एकदा त्यांच्या सहवासात आलेला माणूस सहजासहजी लांब जात नाही. प्रत्येक माणसाशी आदरार्थी वागणे हे एक त्यांचे गुणवैशिष्ट्ये. अशा अनेक गुणांमुळे तरुणांचे संघटन त्यांच्यामागे भरपूर आहे. शिवजयंतीनिमित्त दरवर्षी वांगी येथे पैलवान युवराज मामा रोकडे, पै. सत्यवान सरडे उर्फ पप्पू आण्णा, पै. आबा दैन, पै. लखन पाटोळे, पै. नाना तकिक, पै. रामा गायकवाड, पै. हर्षद दिवटे अशा अनेक तरुण पैलवानांना राहुल जगताप हे एकत्र येऊन महाराष्ट्रातील काटा

पंढरपूर मध्ये संचारबंदीची जिल्हाधिका-यांनी केली घोषणा....

इमेज
अखेर लॉकडाऊनचा निर्णय ....... पंढरपूर आणि परिसरात 6 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून कडकडीत बंद ! पंढरपूर मध्ये ७ ते १३ आॅगस्ट संचारबंदीची जिल्हाधिका-यांनी केली घोषणा.... पंढरपूर / प्रतिनिधि:  पंढरपूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पर्यंत ५८५ हुन अधिक रुग्ण सापडले असुन १९ जणांचा मृत्यु झाला आहे. पंढरपूर शहर व तालुक्याची परिस्थिति आटोक्यात आणणेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ७ ते १३ आॅगस्ट पर्यंत संचारबंदी ची घोषणा पञकार परिषदेत केली. आज सोलापूर मध्ये झालेल्या पञकार परिषदेत हि घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त आदी उपस्थित होते.  पंढरपूर व  परिसरा मध्ये येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची   जिल्हाधिकाऱ्यांनी  घोषणा केली. या कालावधीत प्रदक्षिणा मार्ग आणि परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांची  संख्या कमी झाली नाही तर हाच  लॉक डाऊन आणखी  तीन दिवस म्

आ सुभाष देशमुखांनी बांधली महिला पोलीस उपायुक्तांना राखी

इमेज
रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा ! अशीही व्यक्त झाली कृतज्ञता !! वास्तव न्यूज ......... वास्तव बातमी ..... !...  कोरोनाकाळात शहराचे रक्षण  केल्याने व्यक्त केली कृतज्ञता !     सोलापूर (प्रतिनिधी)  कोरोना संकटाच्या काळात आ. सुभाष देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा सण मोठा साजरा न करता अनोख्या पद्धतीने साजरा केला. या काळात संपूर्ण शहरवासियांचे रक्षण करणार्‍या  महिला पोलिस उपायुक्त  डॉ. वैशाली कडूकर यांना स्वतः आ. देशमुख यांनी राखी बांधत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महापौरांसह अन्नपूर्णा योजनाच्या कर्मचार्‍यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.  दरवर्षी आ. सुभाष देशमुख रक्षाबंधन सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. संपूर्ण मतदारसंघातील शेकडो भगिनी आ. देशमुख यांना राखी बांधण्यासाठी येतात. मात्र यंदा कोराना महामारीचे संकट असल्याने आ. देशमुख यांनी सर्वांना दूरध्वनीवरून सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. देशमुख यांनी अनोखा उपक्रम राबवत कोरोना काळात संपूर्ण शहरवासियांचे  रक्षण करणार्‍या महिला पोलिस उपा

उद्योगपती अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ४० गावात विविध कार्यक्रम

इमेज
पंढरपूर तालुक्यातील कोरोना योद्याचा सन्मान . पंढरपूर/ प्रतिनिधि धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत आबा पाटील यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका,यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अभिजीत आबा पाटील मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त  देगाव व पंढरपूर या ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले.  यामध्ये ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.  पुढील काही दिवस ही  ठिकठिकाणच्या गावामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे असे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले. याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड, मगरवाडी, रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह ४० गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सॅानिटायझर, मास्क वाटप, खाऊ वाटप, मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.  कोरोनाच्या स

अन सदाभाऊंना आली पंढरपूरची आठवण

इमेज
पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालुन केली दुध आंदोलनाची सुरुवात पंढरपूर / प्रतिनिधि मागील पाच - दहा वर्षाचा इतिहास बघितला तर पंढरपूर अन आंदोलन हे समीकरण बनले आहे.  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंञी सदाभाऊ खोत यांचे तर पंढरपूर करांशी जिव्हाळ्याचे नाते होते.  सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असताना त्यांच्या प्रत्येक आंदोलनाची सुरुवात पंढरपूर मधुन होत होती. अन पंढरपूर राज्यभरातील आंदोलनाचा‌ केंद्रबिंदु‌ ठरत असे. माञ मागील पाच वर्षाच्या कालावधीत सदाभाऊ खोत हे राज्यमंञी बनले अन पंढरपूर करांशी असलेला त्यांचा संपर्क कमी झाला. सध्या सत्ताबदल झालेने भाऊंचे  मंञीपद गेले अन भाऊंना पंढरपूर ची आठवण येऊ लागली आहे.     आज शनिवार १ आॅगस्ट रोजी सदाभाऊ खोत हे सकाळी पंढरपूर मध्ये दाखल झाले.  अन नामदेव पायरी येथे पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालत दुध आंदोलनाची सुरुवात केली.  या अगोदर भाऊ  हे पंढरपूर मध्ये आलेवर १०० - २०० कार्यकर्त्यांची गर्दी असायची. माञ आज ही गर्दी पहायला मिळत नव्हती.   सकाळी सदाभाऊ खोत यांनी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ

खाजगी हाॅस्पिटलमधील दोन कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल

इमेज
अपेक्स हाॅस्पिटलच्या दोन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणा-या कर्मचारी व डाॅक्टरवर गुन्हे दाखल करणार : प्रांताधिकारी पंढरपूर / प्रतिनिधि कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पंढरपूर शहरातील हास्पिटल मध्ये  रुग्णांवर उपचार करणेसाठी शहरातील सहा हास्पिटल ताब्यात घेतले आहेत. माञ या हास्पिटल मधील कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कडक कारवाई करत अॅपेक्स हास्पिटल मधील दोन कर्मचा-यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.      या हास्पिटल मधील सिस्टर व वाॅर्डबाय या दोघांविरोधात नायब तहसिलदार विजय जमादार यांनी गुन्हा दाखल केला आहे.  *खाजगी रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टरांनी तात्काळ वैद्यकीय सेवा देवुन रुग्णांचे जीव वाचवावेत. अन्यथा कर्मचारेंसह डाॅक्टरवर देखील शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले*