अन परिचारकांच्या सच्चा कार्यकर्त्याचेही निधन


पंताबरोबरच सच्चा कार्तकत्याचेही कोरोनाने निधन...


पंढरपूर / प्रतिनिधि : सहकारातील डाॅक्टर सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले. याचबरोबर त्यांचे सच्चा कार्यकर्ते, परिचारक गटाचे एकनिष्ठ शेगाव दुमाला‌ ता पंढरपूर येथील माजी सरपंच अभिमन्यु प्रल्हाद आटकळे यांचेही मंगळवारी सकाळी सहा वाजता निधन झाले. 
    अभिमन्यु उर्फ तात्या यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर सोलापूरातील खाजगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शेगाव दुमालाचे माजी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले.  जुन्या पिढीतील परिचारकांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणुन त्यांची ओळख होती. 
   नेत्या पाठोपाठ एकनिष्ठ कार्यकर्त्याचे देखील कोरोनाने निधन झालेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

आजपासुन दोन दिवस पंढरपूर ला येणारे सर्व बस वाहतुक बंद

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान