पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार _-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती           मुंबई,/ प्रतिनिधि :- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.           पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक
इमेज
सावकाराच्या ञासाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या... पंढरपूर / प्रतिनिधि : व्याजाने दिलेल्या पैशाचे वसुलीसाठी ञास दिलेने रांझणी ता पंढरपूर येथील अरुण ज्ञानेश्वर माळी यांनी औषध पिवुन आत्महत्या केली. याबाबत तिघांजणाविरोधात तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, मागील सहा महिन्यापासून ते  24 डिसेंबर पर्यंत रांजणी तालुका पंढरपूर येथील  नागनाथ पवार, महेश अशोक दांडगे, साहेबराव घाडगे यांनी  पैशासाठी तगादा लावत मानसिक ञास दिला. त्रासास कंटाळूनच फिर्यादीचे वडील अरुण ज्ञानेश्वर माळी वय 55 वर्ष यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.    याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे नं 622/20 20 भादवि कलम 306,506,34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,42 प्रमाणे  मुलगा अभिजित माळी  यांनी गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत
इमेज
भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील पंढरपूर / प्रतिनिधि :  येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित होती.  राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे ऑनलाईन पध्दतीने लाॅचिग करण्यात आले असून याट्रॅक्टरची बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊन फवारणी आणि शेतीच्या मदतीला आता घरीच शेतकऱ्यांना मदत होईल. हा ट्रॅक्टर घरीच चार्जिंग करू शकतो, ट्रॅक्टरचा चालू केल्यानंतर आवाज येत नाही, त्याचबरोबर या ट्रॅक्टरचा मेंटेनेस खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा आहे.ट्रॅक्टर ताशी 24.99 किलोमीटर या वेगाने धावतो या ट्रॅक्टर मुळे प्रदूषण होत नाही असा हा पहिलाच इलेक्ट्रिकल ट्रॅक्
इमेज
मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालकाने घेतला  एकाचा बळी...   उपरी येथील घटना  पंढरपूर / प्रतिनिधि : मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालाकाने माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला जोराची धडक दिली. यामध्ये तुकाराम आत्माराम नागणे वय ७५ रा उपरी यांचा जागीच मृत्यु झाला. हि घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.     सध्या ऊस गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतुक वाहने भरधाव वेगाने जात आहेत. टॅक्टर ड्रायव्हर देखील दारु पिवुन वाहन चालवित असलेने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.  मद्यधुंद टॅक्टर ड्राइवर    हा अपघात एवढा भीषण होता की डोक्यावरुन दोन्ही  टेलरची सर्व चार   टायर गेलेने  जागीच मृत्यु झाला. आंबे ता पंढरपूर येथील टॅक्टर असलेची प्राथमिक माहिती मिळत आहे.  मयत नागणे हे पंढरपूर येथील पुजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील व हनुमान दुध डेअरीचे चेअरमन पैलवान साहेबराव नागणे यांचे चुलते होते

लहान बाळांच्या हृदयरोगावर पंढरीत होणार मोफत उपचार...

इमेज
डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने तज्ञ डाॅक्टर करणार उपचार पंढरपूर / प्रतिनिधि :  लहान‌ बाळांच्या हृदयरोग व अन्य गंभीर आजारावर पंढरपूर मध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. शहरातील तज्ञ डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर व आॅपरेशन खर्च देखील‌ मोफत करण्यात येणार असलेचे डाॅ शितल शहा यांनी पञकार परिषदेत सांगितले.  ० ते १८ वर्षातील  लहान बाळाच्या हृदयाचे छिद्र बंद करण्यात येणार आहे. मुंबई नंतर पंढरपूर मध्ये हे एकमेव सेंटर सुरु झालेने नागरिकांची सोय होणार आहे.  बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरजोरात श्वास लागणे, दुध व्यवस्थित न पिणे, दुध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार न्यूमोनिया होणे, हृदयाचे जन्मता छिद्र असणे, ओपनहार्ट शस्ञक्रिया,  फुफसाचे आजार, किडनीचे आजार, मेंदुचे आजार यासह इतर सर्व आजारांवर उपचार करण्यात येत आहेत.  पुणे येथील तज्ञ डाॅ संतोष जोशी हे प्रत्येक रविवारी पंढरपूर मध्ये येवुन या  शिबीरातील बाळांची तपासणी करणार आहेत. याचबरोबर डाॅ शितल शहा, डाॅ सुधी

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन १ लाख रूपयेचे. बक्षिस मिळवा : -अभिजित पाटील

इमेज
महाराष्ट्रातला पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम पंढरपूर / प्रतिनिधि :  कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे.  येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी उद्योगपती अभिजीत पाटील यांच्यावतीने  पंढरपूर तालुक्यात ज्या बिनविरोध ग्रामपंचायत होतील त्यांना यांच्यावतीने १लाख रूपये. बक्षिस म्हणून देण्याची नाविन्या पुर्ण संकल्पना जाहिर केली आहे  .हि संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबल्याने सर्व स्थरातून कौतुक होत आहे.  याकाळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद विवाद,गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी,योजनाची माहिती असणारे तरूणांनी व सर्व जेष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यास

लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी : प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन

इमेज
लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन          पंढरपूर/ प्रतिनिधि :  तालुक्यात शहरासह  ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे.  सार्वजनिक कार्यक्रमामध्ये  गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून, मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.      लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी तसेच कार्यक्रमामध्ये  मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे यामुळे कोरोना बाधित  रुग्णात  वाढ होत  आहे . आयोजकयांनी  तसेच मंगल कार्यालय मालकांनी कोरोनाबाबत  शासनाने  दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे लग्न समारंभाचे ठिकाणी जास्तीत जास्त 100 व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी.  समारंभास जेष्ठ नागरिक व लहान मुलांची उपस्थितीती राहणार याची काळजी घ्यावी. कार्य

ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर

इमेज
अखेर ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर... पंढरपूर / प्रतिनिधि :  राज्यातील मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत कालावधी संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे.  नवीन वर्षात १५ जानेवारी रोजी मतदान होणार असलेने निवडणुका‌ जाहीर झालेल्या गावांमध्ये राजकीय रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.