सावकाराच्या ञासाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या...
पंढरपूर / प्रतिनिधि : व्याजाने दिलेल्या पैशाचे वसुलीसाठी ञास दिलेने रांझणी ता पंढरपूर येथील अरुण ज्ञानेश्वर माळी यांनी औषध पिवुन आत्महत्या केली. याबाबत तिघांजणाविरोधात तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील सहा महिन्यापासून ते 24 डिसेंबर पर्यंत रांजणी तालुका पंढरपूर येथील नागनाथ पवार, महेश अशोक दांडगे, साहेबराव घाडगे यांनी पैशासाठी तगादा लावत मानसिक ञास दिला. त्रासास कंटाळूनच फिर्यादीचे वडील अरुण ज्ञानेश्वर माळी वय 55 वर्ष यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे नं 622/20 20 भादवि कलम 306,506,34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,42 प्रमाणे मुलगा अभिजित माळी यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा