पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवैध वाळु विरोधात तहसिलदारांची धडक कारवाई : सलग तीन दिवस कारवाईत सातत्य

इमेज
                     पंढरपूर :-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे सलग तीन  दिवस  धडक कारवाई करत दोन  तराफा व 17 होड्या नष्ट केल्या असल्याची माहिती तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली.             भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाद्वारे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी भरारी  पथकांची  नेमणूक केली आहे.               भीमा नदी पात्रातील मौजे इसबावी, भटुंबरे येथे गुरुवार दि.29 डिसेंबर रोजी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.  त्यानुसार तेथे पथकाने छापा टाकून 1 तराफा व 9 होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या आहेत. तर शुक्रवार दि. 30 डिसेंबर रोजी पंढरपूर परिसरात 3 होड्या तर शनिवार दि. 31 डिसेंबर  2022 रोज

पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पँनेलचा जल्लोष

इमेज
   पंढरपूर-  दि पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी समविचारी गटाचे सर्व अठरा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक पी.सी.दुरगुडे यांनी दिली. या निर्णयानंतर सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करीत ङ्गटाक्याची अतिषबाजी केली. पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन करून याव्दारे सर्व सतरा जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीची प्रक्रीया पूर्ण झाली व यावर आज गुरूवारी सकाळी निर्णय देण्यात आला. सहायक निबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये केवळ सत्ताधारी गटातील अठरा उमेदवारांची नावे होती. निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक असणारी प्रक्रीया विरोधी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी पूर्ण केली नसल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उमेदवाराची पंढरपूर अर्बन बँकेत एक लाख रूपयाची ठेव असावी, तीस

पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून कायापालट

इमेज
    पंढरपूर :- पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पंढरपूर सबजेलची स्वच्छता व  रंगरगोंटी तसेच कैद्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थेसह आदी आवश्यक कामे लोकसहभातून केली असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली.              पंढरपूर सबजेलमध्ये 7 कारागृह कोठड्या व दोन व्हरांडे  आहेत. या ठिकाणच्या  आतील व बाहेरील भिंतींना रंगरंगोटी, दरवाजांना रंग, जुन्या लाकडी फर्निचरमधून नवीन खुर्च्या व बाकडे तयार करण्यात आली. तसेच कोठडीतील आरोपीना स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.  कोठडीत कैद्यांना सकारात्मक उर्जा मिळावी त्यांच्या आचरणात बदल व्हावा यासाठी समोरील भिंतीवर देवदेवतांचे  भिंती चित्र तसेच स्वच्छ हवा मिळावी यासाठी तुळशी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्याच्या पावसामुळे दिवसांत कोठडीच्या भिंती ओल्या झाल्यावर विद्युत प्रवाह भिंतीत उतरण्याची श्यकता असल्यामुळे  जुन्या झालेले विद्युत उपकरणे बदलून त्याठिकाणी नविन विद्युत उपकरणे टाकण्यात आली. असेही नायब तहसिलदार  श्रोञी यांनी सांगितले सदरचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम 

गादेगाव येथील विदर्भ कोकण बँक फोडली

इमेज
  ही खिडकी फोडून चोरट्यांनी प्रवेश केला पंढरपूर : गादेगाव ता पंढरपूर येथील  विदर्भ-कोकण ग्रामीण बँक फोडून  चोरी केली आहे.   शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी  संध्याकाळी ६ वाजता बँक बंद केल्यानंतर आज सोमवारी सकाळी ९.३० वाजता कर्मचारी बँक  उघडायला आले होते. यावेळी बँकेत चोरी झालेचे समजले.  सुमारे तीन लाख रोख रक्कमेसह दोन लाखांच्या सोन्याची चोरी झालेची प्राथमिक माहिती मिळत असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.  चोरट्यांनी  आत आल्यानंतर मेन पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट केला असून सीसीटीव्ही कनेक्शन देखील कट केले आहे. याचबरोबर  सायरनचे कनेक्शन कट केलेले आहे. त्यानंतर गॅस कटरने सेफ कट करून चोरी केलेली असल्याचे प्राथमिक तपासात दिसुन येत आहे.   घटनास्थळावर पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर तालुका आणी शहर पोलीस ठाण्याची तपास पथके दाखल झाली आहेत. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञ यांचे पथक घटनास्थळी पाचारण केले आहे. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे,  अप्पर पोलीस अधीक्षक . हिम्मत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि धनंजय जाधव यांनी तपास सुरू केला आहे . फिंगर प्रिंट एक्स्पर्ट तपासणी करताना अ

पंढरपूरमध्ये घरगुती गँसचा काळाबाजार : तहसील प्रशासनाची कारवाई

इमेज
                 पंढरपूर :- पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते. सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवुन गुरुवार दिनांक 22 डिसेंबर २०२२ रोजी  तहसिलदार  सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. यापुढे सतत गँसचा काळाबाजार करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली. पुरवठा निरिक्षक  सदानंद नाईक यांना  पंढरपूर येथील कळशेनगर, वडर गल्ली, जुना अकलूज रोड जवळ असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळाली. तहसिल कार्यालयातील कोतवाल प्रल्हाद खरे, महादेव खिलारे  सदर ठिकाणी गेले असता या ठिकाणी ठिकाणी सुभाष शिवाजी जाधव वय - 64 वर्षे रा. पंढरपूर  घरगुती वापरातील चार घरगुती सिलेंडर  टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे दोन इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा (अंदाजे रक्कम 23000

उस वाहतूक मालकांची फसवणूक रोखण्यासाठी उसतोड कामगारांना ओळखपत्र

इमेज
आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रश्नावर सहकार मंत्र्यांची माहिती  नागपूर  /   उस वाहतूक मालकांची फसवणूक रोखण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली .   भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील बेंबळे येथील प्रशांत भोसले यांची मध्यप्रदेशात ऊसतोड मजूर आणायला गेले असता तेथे त्यांची हत्या झाली व या संदर्भाने राज्यातील साखर कारखान्यांची वाहतूकदारांची ऊसतोड मजुर व मुकादमांकडून होणारी फसवणूक टाळण्याकरीता गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत कारखान्यांना ऊसतोड मजुर पुरविण्याच्या अनुषंगाने विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला .  माढा तालुक्यातील बेंबळे येथील ऊस वाहतुकदार व शेतकरी प्रशांत भोसले यांच्या हत्ये संदर्भ आ.रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर शासनाच्या वतीने सहकारमंत्री सावे यांनी उत्तरादाखल सांगितले की,  सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश येथील पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०६/ ११ / २०२२ रोजी FIR दाखल करण्यात आली असून या बा