उस वाहतूक मालकांची फसवणूक रोखण्यासाठी उसतोड कामगारांना ओळखपत्र



आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रश्नावर सहकार मंत्र्यांची माहिती 


नागपूर  /  उस वाहतूक मालकांची फसवणूक रोखण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे ऊसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली . 

 भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील बेंबळे येथील प्रशांत भोसले यांची मध्यप्रदेशात ऊसतोड मजूर आणायला गेले असता तेथे त्यांची हत्या झाली व या संदर्भाने राज्यातील साखर कारखान्यांची वाहतूकदारांची ऊसतोड मजुर व मुकादमांकडून होणारी फसवणूक टाळण्याकरीता गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत कारखान्यांना ऊसतोड मजुर पुरविण्याच्या अनुषंगाने विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला . 

  • माढा तालुक्यातील बेंबळे येथील ऊस वाहतुकदार व शेतकरी प्रशांत भोसले यांच्या हत्ये संदर्भ आ.रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर शासनाच्या वतीने सहकारमंत्री सावे यांनी उत्तरादाखल सांगितले की,  सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश येथील पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०६/ ११ / २०२२ रोजी FIR दाखल करण्यात आली असून या बाबत सरकार पाठपुरावा करत आहे.


आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी  उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर  गाळप हंगाम २००४ ते २०२० या १६ वर्षांच्या कालावधीत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मुकादमाकडून रुपये ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ ची फसवणूक झाल्याची कबूली देत  ऊसतोड मजुर व मुकादमांकडून ऊस वाहतुकदार व साखर कारखानदार यांच्या होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्याबाबत तसेच ऊसतोड मजुर व मुकादम यांची गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाकडे नोंदणी करुन महामंडळामार्फत ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकाने विहित नमुन्यात नोंदणी करुन ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षण/नोंदणीसाठी वेब व मोबाईल अॅप्लीकेशन महाआयटी मार्फत करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन नोंदणी करीता वेब पोर्टल तयार करण्याची कार्यवाही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या स्तरावर सुरू असल्याची माहीती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई