पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर विठ्ठल कारखान्याची निवडणुक जाहीर

इमेज
पंढरपूर/ प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला.  यानुसार 5 जुलै रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ३ जून ते ९ जून या कालावधीत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे १३ ते २७ जून पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी कालावधी असून २८ जून रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. 5 जुलै रोजी मतदान होणार असून 6 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुदत संपली असतानाही निवडणूक लांबणीवर पडली होती आणि ही निवडणूक लवकर व्हावी अशी काही संचालक आणि सभासदांचीही मागणी होत होती. काही पदाधिकारी यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यानाही भेटलेले होते. अनेकांना या निवडणुकीची प्रतीक्षा लागलेली असतानाच आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला

रक्त सांडू... पण हक्काचे एक थेंब पाणी देणार नाही....

इमेज
  उपरीत रस्ता रोको आंदोलन प्रसंगी स्वाभिमानीचा निर्धार .. उपरी ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाकडी निंबोडी योजनेंतर्गत पाणी नेण्यास विरोध म्हणुन सोमवारी सकाळी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिनजी पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल, पक्षाचे तालुकाध्यक्ष पै साहेबराव नागणे, जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे, मनोज गावंधरे, बाहुबली सावळे, शहाजी जगदाळे, सुशिलकुमार शिंदे, सचिन घोडके, श्रीनिवास नागणे, अमित नागणे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल म्हणाले, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवुन नेवून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळेस बोलताना तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पालकमंत्री हे शेतकर्यांची कशी दिशाभूल करत आहेत याचा पाढा वाचला. एकीकडे जिल्ह्यातील योजनांना निधी मिळत नाही मात्र दुसरीकडे एका रात्रीत या योजनेला निधी कसा उप

पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधी : – रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील व रयत शिक्षण संस्थेतील एक नामांकित  महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी दिली.         सोलापूर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले असून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील होत असलेले सर्व बदल महाविद्यालय स्वीकारत असून राष्ट्रीय महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत ६७ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील असते. महाविद्यालयाच्या विकासाची वाटचाल माजी विद्यार्थ्यांना समजावी व या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेता यावे. या उद्देशाने रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ‘माजी व