अखेर विठ्ठल कारखान्याची निवडणुक जाहीर


पंढरपूर/ प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला. 
यानुसार 5 जुलै रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ३ जून ते ९ जून या कालावधीत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे १३ ते २७ जून पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी कालावधी असून २८ जून रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. 5 जुलै रोजी मतदान होणार असून 6 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुदत संपली असतानाही निवडणूक लांबणीवर पडली होती आणि ही निवडणूक लवकर व्हावी अशी काही संचालक आणि सभासदांचीही मागणी होत होती. काही पदाधिकारी यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यानाही भेटलेले होते. अनेकांना या निवडणुकीची प्रतीक्षा लागलेली असतानाच आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार असून ६ जुलै रोजी नवे संचालक मंडळ कारखान्यावर अस्तित्वात येईल. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान नव्या संचालक मंडळाच्या समोर असणार आहे. 


खालील बातमी पाहण्यासाठी टच करा >>>>

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई