सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई

 



पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळू विक्री करणा-या सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर ग्रामीण पोलीसांनी कारवाई करीत अटक केली असल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली. 

  • यातील आरोपी अशोक शिंगारे हे मांजरी ता. सांगोला गावचे माजी सरपंच असून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना वर्षभरापूर्वी जेवु घातल्याने हॉटेलच्या बिलाची काही दिवसापूर्वी जाहीर मागणी करून प्रसार माध्यमात खळबळ उडवून दिली होती.


याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, रविवार दि ११ सप्टेंबर रोजी सकाळी तिसंगी ता पंढरपूर येथे पांढ-या रंगाच्या पिकअपमधून अवैध वाळू खाली करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. तात्काळ याठिकाणी पोलीस गेले असता सदर पिकअप वाळू खाली करुन जात असताना चालक अशोक सुखदेव शिनगारे, तुषार राजेंद्र सलगरे दोघे  रा मांजरी तां सांगोला यांनी पोलीसांना धक्काबुक्की करुन जात असतानाच पोलीसांनी पकडले. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब कर्चे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह