पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्कुलबसवर परिवहन विभागाची कारवाई

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधि :  अवैधरित्या पंढरपूर शहर व तालुक्यातून विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे स्कुलबसवर परिवहन (RTO) विभागाने कारवाई सुरु केली आहे. आज अखेर पंढरपूर शहर व तालुका परिसरातील एकुण 76 वाहनांवर कारवाई केली आहे. याचबरोबर संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातील ६०३ वाहनांवर कारवाई करीत ६३ वाहने जप्त केली असून तब्बल ६ लाख ४० हजार ४५० रुपयांचा दंड केला  असल्याची माहिती परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली .  याबाबत अधिक माहिती अशी की,वेळोवेळी स्कुलबस धारकांना वाहनांची तपासणी करून घेण्याबाबत कळवले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळालेला होता मात्र अजून बऱ्याच स्कुलबस तपासणी साठी आलेल्या नाहीत त्यासाठी मा परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार व मा उप प्रा परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहा प्रा प अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबवण्यात आली.   सुट्टीच्या दिवशीही (शनिवार व रविवारी) अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करून स्कुलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम कार्यालयात सुरु ठेवले आहे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी या पुढेही अशी मोहीम राबवून दोषी स्कुलबस वर कार

सीआयडीचे पोलीस असल्याचे सांगत लुटले सोने

इमेज
वाखरी येथे भर दिवसा घडली घटना   पंढरपूर / प्रतिनिधी :  मी सीआयडीचा साहेब आहे,  गांजा विकणारा माणूस आम्ही शोधत आहोत असे म्हणत वाखरी तालुका पंढरपूर येथे बुधवारी दुपारी दीड वाजता एक लाख 75 हजारचे सोन्याचे दागिने  लुटल्याची घटना घडली.  याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की उपरी तालुका पंढरपूर येथील अंकुश रामचंद्र मोहिते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी किसन नागणे यांच्यासोबत शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथे गेले होते.  लग्नकार्य उरकून परत गावाकडे जात असताना दुपारी दीड वाजता  वाखरी चौकाच्या अलीकडील चिंचेच्या झाडाजवळ काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गाडी थांबवण्यास सांगितले.  गाडी थांबवल्यानंतर त्या व्यक्तीने रस्त्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तिस थांबवून त्याचे किसे तपासले व गळ्यातील चैन काढून रुमालात बांधून त्याच्याकडे दिली.  यानंतर मी सीआयडी चा साहेब आहे गांजा पुड्या विकणारा माणूस तपासत असून तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही

जागेच्या वादातून केला खून पंढरपूर तालुक्यातील घटना

इमेज
   जागेच्या वादातून खून : पाच जणांवर गुन्हा दाखल पंढरपूर / प्रतिनिधी : लक्ष्मीटाकळी ता पंढरपूर येथील हाॅटेल वैभवराजच्या जागेच्या कारणावरुन रविकांत प्रतापसिंह पाटील यांच्या मोटारसायकलला  इनोव्हा कारने धडक देवून अपघाताचा बनाव करीत खून केला. याप्रकरणी हाॅटेलचालक परमेश्वर देठे,  दोन मुले स्वप्निल उर्फ रणजित देठे, प्रशांत देठे, पुतण्या नितीन देठे, सर्व रा लक्ष्मीटाकळी यांचेसह कामगार विजय बलभिम कोळेकर रा फुटरस्ता कोर्टी यांचेविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली. याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, हाॅटेलच्या जागेच्या कारणावरुन जागा मालक प्रतापसिंह सर्जेराव पाटील  व  हाॅटेलचालक परमेश्वर देठे यांच्यात वाद सुरु होता. या वादातुन एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल आहेत. मंगळवारी सकाळी रविकांत पाटील हे कामानिमित्त मोहोळला जात असताना पाळत ठेवून पाठलाग करीत इनोव्हा एम एच १४ सी एस ७३५१ ने मोटारसायकल एम एच १३ सी एच ९६९२ ला पाठीमागून जोराची धडक देत २०० फुट रोडवर फरफटत नेले. अपघाताचा बनाव करीत खून केला.  ही घटना सकाळी ९ वाजणेच्या सुमारास देगाव येथील नायर

विठ्ठल कारखान्यामध्ये सत्तांतर

इमेज
  " विठ्ठल " मध्ये परिवर्तन उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचा विजय पंढरपूर / प्रतिनिधी : तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. सोलापुर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. तर भालके - काळे गटाचे संस्था मतदार संघातून समाधान काळे हे एकमेव विजयी झाले. याचबरोबर युवराज दादा पाटील यांच्यासह विद्यमान चेअरमन भगिरथ भालके गटाचा  पराभव झाला. विठ्ठलसह सहकार शिरोमणी कारखान्याच्या शेतक-यांची थकलेली ऊसबिलामुळे काळे - भालके गटाला फटका बसल्याचे बोलले जात आहे भाळवणी गट मोहन बागल ६९४२, रुक्मीणी बागल ६६२७, विलास देठे ६४८५, मधुकर गिड्डे ६९६२, धनंजय काळे ८३२७, अरविंद लोकरे १४, मोहन लोकरे २०,  साहेबराव नागणे ८३१५, कालिदास पाटील ८१६५, दिपक पवार ७००८, बाळासाहेब यलमर ६२६०  तर भाळवणी गटात ३७४ मते बाद झाली. करकंब गट मारुती भिंगारे ६६८१, जिवराज चव्हाण ५५, रामकृष्ण जवळेकर ७०१०,  दशरथ खळगे ६४१२, शहाजी मुळे ६६६६, नवनाथ नाईकनवरे ८५००, दत्ताञय नरसाळे ७९३०, हणमंत