जागेच्या वादातून केला खून पंढरपूर तालुक्यातील घटना

  जागेच्या वादातून खून : पाच जणांवर गुन्हा दाखल





पंढरपूर / प्रतिनिधी : लक्ष्मीटाकळी ता पंढरपूर येथील हाॅटेल वैभवराजच्या जागेच्या कारणावरुन रविकांत प्रतापसिंह पाटील यांच्या मोटारसायकलला  इनोव्हा कारने धडक देवून अपघाताचा बनाव करीत खून केला. याप्रकरणी हाॅटेलचालक परमेश्वर देठे,  दोन मुले स्वप्निल उर्फ रणजित देठे, प्रशांत देठे, पुतण्या नितीन देठे, सर्व रा लक्ष्मीटाकळी यांचेसह कामगार विजय बलभिम कोळेकर रा फुटरस्ता कोर्टी यांचेविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पो नि मिलींद पाटील यांनी दिली.





याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, हाॅटेलच्या जागेच्या कारणावरुन जागा मालक प्रतापसिंह सर्जेराव पाटील  व  हाॅटेलचालक परमेश्वर देठे यांच्यात वाद सुरु होता. या वादातुन एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल आहेत. मंगळवारी सकाळी रविकांत पाटील हे कामानिमित्त मोहोळला जात असताना पाळत ठेवून पाठलाग करीत इनोव्हा एम एच १४ सी एस ७३५१ ने मोटारसायकल एम एच १३ सी एच ९६९२ ला पाठीमागून जोराची धडक देत २०० फुट रोडवर फरफटत नेले. अपघाताचा बनाव करीत खून केला.  ही घटना सकाळी ९ वाजणेच्या सुमारास देगाव येथील नायरा पेट्रोलपंप ते पंचरत्न हाॅटेलच्या दरम्यान‌ घडली.
घटनास्थळी पो नि मिलींद पाटील, सपोनि खरात, सपोनि ओलेकर, गोदे यांनी पाहणी करीत सदरचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आलेने अधिक तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई