पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

इमेज
  पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख  ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती                                                                                  पंढरपूर :- जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  सोलापूर शहरासाठी पिण्याकरीता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून  पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव राहावे यासाठी भीमा नदी व निरा उजवा कालवा काठचा वीजपुरवठा बंद ठेवावा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या  तसेच पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली  असल्याचेही त्यांनी सांगितले.               पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत. सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. या काळात भीमा नदी व निरा उजवा कालवा काठच