सुपलीच्या व्यक्तीचा लातुर जिल्ह्यात खून ! एका महिलेसह दोघे पोलीसांच्या ताब्यात
पंढरपुर / प्रतिनिधी : सुपली ता पंढरपूर येथील भानुदास जगनाथ माळी वय ६० यांचा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात खून झालेने एकच खळबळ माजली आहे. भानुदास माळी हे २८ मे रोजी दुपारी १२.३० हे पंढरपुरातून पैसे घेवून येतो म्हणून घरातून गेले होते. माञ ते परत न आलेने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला. माञ ते सापडले नसलेने नातेवाईकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवलेबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शानाखाली पो नि धनंजय जाधव यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली. भानदास माळी' हे ज्यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेले होते, त्या व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी केली आणि एका महिलेसह एका तरुणास निलंगा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. निलंगा येथील पोलिसांनी अटक केलेली महिला व पुरुष याबाबत निलंगा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार निलंगा लातुर ते जहीराबाद मार्गावरील पानचिंचोलीवर येथे ३० मे रोजी रोडच्या कडेला एका अनोळ...