सुपलीच्या व्यक्तीचा लातुर जिल्ह्यात खून ! एका महिलेसह दोघे पोलीसांच्या ताब्यात

 


                   

पंढरपुर / प्रतिनिधी : सुपली ता पंढरपूर येथील भानुदास जगनाथ माळी वय ६० यांचा  लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात खून झालेने  एकच खळबळ माजली आहे. भानुदास माळी हे २८ मे रोजी दुपारी १२.३० हे पंढरपुरातून    पैसे घेवून येतो म्हणून  घरातून गेले होते. माञ  ते परत न  आलेने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला. माञ ते सापडले नसलेने नातेवाईकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवलेबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शानाखाली पो नि धनंजय  जाधव यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली. भानदास माळी' हे ज्यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेले होते, त्या व्यक्तींकडे पोलिसांनी चौकशी  केली आणि एका महिलेसह एका तरुणास निलंगा पोलिसांनी ताब्यात  घेत अटक केली आहे. 

निलंगा येथील पोलिसांनी अटक केलेली महिला व पुरुष




याबाबत निलंगा पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार निलंगा लातुर ते जहीराबाद मार्गावरील पानचिंचोलीवर येथे ३० मे रोजी रोडच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले. लातूर जिल्हा पोलीस प्रमुख निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पो नि बाळकृष्ण शेजाळ यांनी बारकाईने तपासाला सुरुवात केली. सदरचे प्रेत हे कुजलेले अवस्थेत असलेने पानचिंचोली येथे दफनविधी करण्यात आले. तपासादरम्यान निलंगा तालुक्यातील इनामवाडी येथील अमरनाथ अशोकराव किने वय २१ याने पंढरपुर येथील साधना धुमाळ वय ४० रा सांगोला रोड पंढरपुर हिच्या मदतीने निलंगा - लातुर रोड प्रवासा दरम्यान राञी १० ते ११ वाजता गाडीतच  गळा आवळत खून केला. तपासादरम्यान  मयत भानुदास माळी यांचे आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याचबरोबर  पैशाच्या  कारणावरुन वाद सुरु होता.  यामुळे महिलेने नवीन २१ वर्षाच्या प्रियकराच्या मदतीने भानुदास  माळी यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. निलंगा पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या माळी यांचे नातेवाईक निलंगा येथे गेले असून पुरलेला मृतदेह काढुन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कामगिरी लातुर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि बाळकृष्ण शेजाळ, नितीन मजगे, राठोड, गर्जे, शिंदे, बळीराम मस्के, महिला पोलीस गरगटे, सगर यांनी केली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई