गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह
![]() |
| गुरसाळे बंधारेवर मयताची पाहणी करताना पो नि मिलींद पाटील, सपोनि ओलेकर |
पंढरपूर / प्रतिनिधी : गुरसाळे ता पंढरपूर येथील बंधारेत पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे वय 35 -40 वर्षे सडलेल्या अवस्थेत दिनांक 19 आँक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मिळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पंढरपूर तालुका पोलीस सदर मयताची ओळख पटवणेसाठी अधिक तपास करीत आहेत.
| आमचेकडे सर्व प्रकारचे गाड्या योग्य दरात भाड्याने मिळतील : |
सदर मयताच्या डाव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'आश्विनी' व बदाम आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आहे.
![]() |
| मयताचे हातावरील गोंदलेले नाव |
त्याचबरोबर त्याचे अंगात पिस्ता रंगाचा शर्ट असून कॉलरचे आतील बाजूस Cruze India असे लेबल असलेला शर्ट व निळ्या- राखाडे रंगाची अंडरविअर खिशात लाल रंगाची तंबाखूचा बटवा आहे.
सदर मयताचे वय अंदाजे 35 - 40 वर्ष असून उंची अंदाजे 5 फुट 6 इंच आहे. तरी वरील वर्णनाचे मयत व्यक्ती बाबत माहिती मिळाल्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क करणेचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पो नि मिलिंद पाटील : 9892177789
सपोनि ओलेकर : 8888874362
पोहे : सय्यद 9405357540


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा