पोस्ट्स

कॉरिडॉरचे कामात कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, सौ. प्रभावती माने यांच्यासमवेत केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीच...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपञाचे मुख्यमंत्रींचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

इमेज
संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला पंढरपूर : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड आदी उपस्थित होते. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यां...

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणाचे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती

इमेज
  मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन इथापे.                  पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी शनिवार ०७ फेब्रुवारी  रोजी ३०९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले.  या निवडणूकीत एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची  मतमोजणी सोमवारी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी १०.०० वाजता सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती  निवडणूक निर्णय  अधिकारी तथा उपविभागीय  अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.    पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व पंचायत समितीच्या १६ गणासाठी ६९.४४ टक्के इतके मतदान झाले असून, निवडणूकीत एक लाख ५ हजार ६५७ पुरुष तर  ९२ हजार ८१० स्त्री अशा एकूण  एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच  ६६३ टपाली मतदान झाले आहे. मतमोजणी १६ टेबलवर होणार असून दोन राखीव टेबल ठेवण्यात आले आहे. तर  टपाली मतमोजणी ...

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

इमेज
  पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख  ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती                                                                                  पंढरपूर :- जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  सोलापूर शहरासाठी पिण्याकरीता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच निरा उजवा कालव्यातून  पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव राहावे यासाठी भीमा नदी व निरा उजवा कालवा काठचा वीजपुरवठा बंद ठेवावा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या  तसेच पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली  असल्याचेही त्यांनी सांगितले.               पाणीटंचा...

डॉल्बीच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला : पाणीवेसच्या 15 कार्यकर्त्यांची मुक्तता

इमेज
  अँड . शशी कुलकर्णी सोलापूर / प्रतिनिधी :  येथील (पाणीवेस) दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर सुभाष सिरसट, निलेश शंकर काटकर, सुरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार बंडोबा पवार,आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार(जाधव), रोहित सुभाष सातपुते, अभिजीत विजयकुमार हविनाळ, निखिल सुनिल भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरुन, पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अति. सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की, दि ६ जानेवारी २०१५ रोजी पोलीसांना डोणगांव रोडवरील एका फार्म हाऊसवर डॉल्बीचा आवाज ऐकू आल्याने रात्र गस्तीवर असणारे कर्मचारी/ पोलीस उपनिरिक्षक विश्वास भाबड व त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी वानकर फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांना अंदाजे २० ते २५ तरुण डॉल्बीवर मद्यधुंद अवस्थेत नाचत असताना आढळून आले. त्यांना डॉल्बी बंद करण्यास...

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

इमेज
  गुरसाळे बंधारेवर मयताची पाहणी करताना पो नि मिलींद पाटील, सपोनि ओलेकर  पंढरपूर / प्रतिनिधी :   गुरसाळे ता पंढरपूर येथील बंधारेत  पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे वय 35 -40 वर्षे सडलेल्या अवस्थेत दिनांक 19 आँक्टोबर  रोजी सकाळी 10 वाजता  मिळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पंढरपूर तालुका पोलीस सदर मयताची ओळख पटवणेसाठी अधिक तपास करीत आहेत.   आमचेकडे सर्व प्रकारचे गाड्या योग्य दरात भाड्याने मिळतील :  +919503093385  सदर मयताच्या डाव्या हाताचे पोटरीवर मराठीत 'शीतल' व उजव्या हाताचे पोटरीवर मराठीत  'आश्विनी' व  बदाम  आकारामध्ये 'माँ ' असे गोंदलेले आहे .  मयताचे हातावरील गोंदलेले नाव त्याचबरोबर त्याचे अंगात पिस्ता रंगाचा शर्ट असून कॉलरचे आतील बाजूस  Cruze India असे लेबल असलेला शर्ट व निळ्या- राखाडे रंगाची  अंडरविअर खिशात लाल रंगाची तंबाखूचा बटवा आहे.  सदर मयताचे  वय अंदाजे 35 - 40 वर्ष असून  उंची अंदाजे 5 फुट 6 इंच आहे.  तरी वरील वर्णनाचे मयत व्यक्ती बाबत माहिती मिळाल्यास पंढरपूर तालुका पो...

अवैध वाळू साठ्यावर महसूल प्रशासनाची कारवाई

इमेज
  10 ब्रास वाळू साठा, 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर :-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे कासेगांव (ता.पंढरपूर) येथे  अवैध  वाळू साठ्यावर  धडक कारवाई  केली असून, त्यामध्ये  10 ब्रास वाळू  व 4 लाख 57 हजारांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक व साठा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. अवैध गौण खनिज विरोधी पथकाने मौजे कासेगाव येथील गट नंबर 27/ 1अ  येथे अचानक भेट दिली  असता,  सदर ठिकाणी गणेश मनोहर गंगथडे व चैतन्य मनोहर गंगथडे यांच्या  नावे असलेल्या गट नंबर 27/ 1अ  मध्ये 10  ब्रास  अवैधरित्या वाळूसाठा  केलेला दिसून आला. तसेच सदर वाळू साठ्याच्या ठिकाणी एमएच 11 एजी 2...

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

इमेज
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई    पंढरपूर / प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने बुधवारी (ता. 21) वाखरी गावाच्या हद्दीत एका पिकअप वाहनातून दीड लाखाची गोवा राज्य निर्मित विदेशी दारु जप्त केली.    राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाचे निरिक्षक किरण बिरादार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वाखरी (ता. पंढरपूर) गावाच्या हद्दीत वाखरी-गादेगाव रोडवर सापळा रचून  अशोक लेलॅंड कंपनीच्या चारचाकी पिकअप वाहन क्र MH 42 BF 2671 चा पाठलाग केला असता वाहनचालक गाडी सोडून फरार झाला. निरिक्षक पंढरपूर यांनी सदर वाहनाची झडती घेतली असता जनावराच्या चाऱ्याआड विदेशी दारूच्या पेट्या लपवून ठेवल्याचे दिसून आले. वाहनात 25 कागदी बाॅक्समध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेल्या एड्रीयल क्लासिक व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 300 सीलबंद बाटल्या आढळून आल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात एक लाख छप्पन हजार किंमतीची दारु व पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख सह...

उपरीतील दत्तात्रय नागणे यांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश

इमेज
    प्रतिनिधी पंढरपूर /- सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा भाळवणी गटामध्ये उपरी गाव भेट दौरा असताना उपरीचे माजी सरपंच दत्तात्रय माणिकराव नागणे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला. एकेकाळी भालके व काळे गटात प्रामाणिकपणे काम केलेल्या सहकाऱ्याला आज अभिजीत पाटलांची ओढ लागलेने  कारखाना निवडणुकीत रंगत वाढली आहे.  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काळे भालके गटाचे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराज होऊन आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विश्वासावर सभासदांनी विश्वास ठेवला असून त्यांना चांगला ऊस दर देता आला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने देखील विठ्ठल प्रमाणे ऊसदर देण्यात येईल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यापुढे विठ्ठल प्रमाणे सहकार शिरोमणी ला दर दिला जाईल या अनुषंगाने काळे भालके गटातील अनेक पदाधिकारी अभिजीत पाटील गटात येण्यास उत्सुक आहेत अशी सर्वत्र चर्च...

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

इमेज
  पंढरपूर / प्रतिनिधी :   वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सोमवारी अचानक वादळी वारे व अवकाळी पा ऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे  नुकसान झालेची माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्कंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे.  सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपूर्ण पत्रे उडून झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजलेले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान  झालेले आहे.  विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्कंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे.  कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे उडून गेलेने नुकसान झालेले आहे. आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गेलेले आहे...