घरात घुसून महिलेचा विनयभंग व तिच्या पतीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा

 




पंढरपूर/ प्रतिनिधि : घरात  टी.व्ही. पाहत असताना आरोपी  शहाजी भिमराव गायकवाड रा. करोळे ता. पंढरपूर याने घरात घुसून  फिर्यादीस तु मला फार आवडते असे म्हणुन फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य करीत विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीचा पती तेथे आला असता त्यांना शिवीगाळी, दमदाटी करून आरोपीने त्याचे हातातील ऊस तोडणीचे कोयत्याने फिर्यादीच्या डावे हातावर व उजवे पायाचे गुडघ्यावर मारून किरकोळ व गंभीर जखमी केले. याप्रकरणी पंढरपूर येथील  प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी श्रीमती आर. जे. कुंभार यांनी आरोपीस  सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात  भा.द.वि.कलम ३२६, ३५४, ३५४अ, ४५२, ३२४,५०४,५०६ शस्त्र अधिनियम ४,२५ सह महा. पो.अधि.कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हयाचा तपास करून पोलीस हेड कॉ./ बी.के. मोरे यांनी यातील आरोपी विरूध्द मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

  • सदर खटल्यात सरकारी वकील  एम. एम. पठाण यांनी सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले आहेत. सदर साक्षीदारांचे जवाब व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून  न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम ३२६, ३५४, ३५४ अ, ४५२, मध्ये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३२६ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड भा.द.वि. कलम ३५४ मध्ये ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड भा.द.वि.कलम ३५४ अ मध्ये ३ महिने सश्रम कारावास व भा.द.वि. कलम ४५२ मध्ये ३ महिने साधी कैद व ५००/- रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे सदरचा खटला जलदगतीने चालवुन एक वर्षाच्या आत न्यायालयाने निकाल दिला. 


सदर खटल्यात  कोर्ट ऑर्डली म्हणुन पोलीस कॉ./अमोल लोकरे व कोर्ट पैरवी म्हणून सहा. फौजदार रावसाहेब वाघमारे यांनी कामकाज पाहीले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई