आजपासुन दोन दिवस पंढरपूर ला येणारे सर्व बस वाहतुक बंद




दोन व अधिक व्यक्तिंनी पंढरपूर मध्ये एकञ आलेस होणार कारवाई....



पंढरपूर / प्रतिनिधि : आज गुरुवारी राञी बारा वाजलेपासुन शनिवारी राञी बारा वाजेपर्यंत  पंढरपूर ला येणारे सर्व एस टी बस सेवा बंद करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

    मराठा समाजाचे शनिवारी पंढरपूर ते मुंबई अशी आक्रोश दिंडी निघणार आहे. या पार्श्वभुमिवर पंढरपूर शहरात कोरोनाच प्रादुर्भाव वाढु नयेत यासाठी हे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. याचबरोबर आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर परिसर, महाद्वार घाट, नामदेव पायरी, चौफाळा, पश्चिमद्वार परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात दोन पैक्षा अधिक व्यक्तिंना एकञ जमण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.


    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान