वादळी वा-याने विठ्ठल कारखान्याचे सुमारे ३ कोटींचे नुकसान

 



पंढरपूर / प्रतिनिधी :   वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सोमवारी अचानक वादळी वारे व अवकाळीपा ऊसामुळे कारखान्याचे मालमत्तेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे  नुकसान झालेची माहिती कार्यकारी संचालक गायकवाड यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे.




कारखान्याचे कर्मचारी यांचे मोटार सायकल पार्कंग शेडवर झाड कोसळल्याने कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकलचे नुकसान झालेले आहे. सभासद साखर वाटप दुकानावरील लोखंडी पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून जावून सभासदांना वाटून शिल्लक राहिलेली अंदाजे ३० ते ३३ क्विंटल साखर भिजलेली आहे. तसेच त्याचे शेजारी कामगार पतसंस्थेवरील संपूर्ण पत्रे उडून झेरॉक्स मशिन व कॉम्प्युटर व पतसंस्थेचे रेकॉर्ड भिजलेले असून व इतर साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  विठ्ठल प्रशालेतील विद्यार्थी व स्टाफसाठी तयार केलेले सायकल व मोटार सायकल पार्कंग शेड वाऱ्यामुळे पुर्ण पडलेले आहे. कारखान्याचे साखर गोडावून नंबर १६ व १७ वरील सिमेंटचे संपुर्ण पत्रे उडून गेलेने नुकसान झालेले आहे.आर.ओ. प्लॅन्टवरील नवीन पत्रे उडून गेलेले आहेत. इंजिनिअरींग ऑफीस, शुगर हाऊस, टबाईन, बॉयलींग हाऊस इत्यादी वरील सिमेंटचे पत्रे उडून जावून फुटलेले आहेत व शटर्स खराब झालेले आहेत. कारखान्याचे डिस्टीलरी विभागातील प्लॅन्टवरील सिमेंटचे पत्रे, पाण्याच्या टाक्या, ऑफीसच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. बेणे मळा व साखर शाळा येथील पाण्याच्या प्लॅस्टीकच्या ५००० लिटर क्षमतेच्या दोन टाक्या वाऱ्यामुळे उडून गेलेल्या आहेत.





कारखाना साईटवरील हमाल चाळीतील १,२,३ व ४ या चाळीतील सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले आहे. सुरक्षा विभागातील मेनगेट ऑफीसच्या खिडक्याच्या काचा, खिडक्या याचे फुटून नुकसान झालेले आहे. कारखाना कॅन्टींगच्या खिडक्याच्या काचा फुटून नुकसान झालेले आहे. कारखाना साईटवरील बरीच झाडे वाऱ्यामुळे उनमळून पडलेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कारखाना साईटवरील विद्युत पुरवठा करणारे बऱ्याच ठिकाणचे पोल पडलेले आहेत त्यामुळे विद्युत वाहक तारा व वायरींगचे तुटून अतोनात नुकसान झालेले असून एकूण अंदाजे रु.२.५० कोटी ते रु.३.०० कोटी पर्यंतचे नुकसान कारखान्याचे झालेले आहे.



वरीलप्रमाणे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय स्तरावरुन चौकशी करुन त्वरीत योग्य ते पंचनामे करणेसाठी तहसिल कार्यालय पंढरपूर, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व गुरसाळे गाव कामगार तलाठी यांना कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी नुकसनीबाबत पत्राव्दारे कळविलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई