उपरीतील दत्तात्रय नागणे यांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश

 




 प्रतिनिधी पंढरपूर /- सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा भाळवणी गटामध्ये उपरी गाव भेट दौरा असताना उपरीचे माजी सरपंच दत्तात्रय माणिकराव नागणे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला. एकेकाळी भालके व काळे गटात प्रामाणिकपणे काम केलेल्या सहकाऱ्याला आज अभिजीत पाटलांची ओढ लागलेने  कारखाना निवडणुकीत रंगत वाढली आहे. 


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काळे भालके गटाचे पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराज होऊन आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विश्वासावर सभासदांनी विश्वास ठेवला असून त्यांना चांगला ऊस दर देता आला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने देखील विठ्ठल प्रमाणे ऊसदर देण्यात येईल असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. यापुढे विठ्ठल प्रमाणे सहकार शिरोमणी ला दर दिला जाईल या अनुषंगाने काळे भालके गटातील अनेक पदाधिकारी अभिजीत पाटील गटात येण्यास उत्सुक आहेत अशी सर्वत्र चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.

यावेळी स्वेरीचे सचिव बी.पी. रोंगे सर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पै साहेबराव नागणे, बाबुराव नागणे, पोपट नागणे, नवनाथ आसबे, नवनाथ नागणे, हनुमंत पाटील, सतीश नागणे, दीपक नागणे, महादेव नागणे, नवनाथ गव्हाणे, अजय मोहिते, हनुमंत जाधव, किसन माने, पांडुरंग नागणे, स्वागत नागणे, महादेव नागणे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई