डॉल्बीच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला : पाणीवेसच्या 15 कार्यकर्त्यांची मुक्तता

 

अँड . शशी कुलकर्णी


सोलापूर / प्रतिनिधी :  येथील (पाणीवेस) दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर सुभाष सिरसट, निलेश शंकर काटकर, सुरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार बंडोबा पवार,आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार(जाधव), रोहित सुभाष सातपुते, अभिजीत विजयकुमार हविनाळ, निखिल सुनिल भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरुन, पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अति. सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.



यात हकीकत अशी की, दि ६ जानेवारी २०१५ रोजी पोलीसांना डोणगांव रोडवरील एका फार्म हाऊसवर डॉल्बीचा आवाज ऐकू आल्याने रात्र गस्तीवर असणारे कर्मचारी/ पोलीस उपनिरिक्षक विश्वास भाबड व त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी वानकर फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांना अंदाजे २० ते २५ तरुण डॉल्बीवर मद्यधुंद अवस्थेत नाचत असताना आढळून आले. त्यांना डॉल्बी बंद करण्यास सांगितले असता त्यानी त्यास नकार देवून पोलीसांवर लाकडाने, दगडाने हल्ला केला व त्यांना जखमी केले.  त्यानंतर सदर पोलीस अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाकडून जादा कुमक मागवून हल्ला करण्याच्यापैकी १० जणांना ताब्यात घेतले व घटनास्थळीच्या गाड्या जप्त करुन पोलीसांनी, सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा विविध प्रकारचे गुन्हा केल्याप्रकरणी त्यांच्यावर सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.  तपास करुन  न्यायालयात त्या १५ जणांविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी  अति सत्र न्यायाधिश राणे सो यांच्या समोर झाली. त्यामध्ये सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये ६ पोलीस अधिकारी, २ डॉक्टर आणि २ पंच यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या. खटल्याचे चौकशीवेळी आरोपीचे वकील अँड. शशी कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, अशी कोणतीही घटना घडली नाही, पोलीसांचे गणवेश, त्यांना मारहाण झालेल्या जखमा, स्वतंत्र साक्षीदार, ध्वनीमापक यंत्र या सर्व बाबींची कुठेही सुसुत्रता नसून साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे. त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे साबित / सिध्द होत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अँड. शशि कुलकर्णी, अँड. स्वप्निल सरवदे, अँड. रणजित चौधरी, ॲड. प्रसाद अग्निहोत्री, अँड. आशुतोष पुरवंत यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अँड. देशपांडे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई