स्कुलबसवर परिवहन विभागाची कारवाई




पंढरपूर / प्रतिनिधि :  अवैधरित्या पंढरपूर शहर व तालुक्यातून विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे स्कुलबसवर परिवहन (RTO) विभागाने कारवाई सुरु केली आहे. आज अखेर पंढरपूर शहर व तालुका परिसरातील एकुण 76 वाहनांवर कारवाई केली आहे. याचबरोबर संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातील ६०३ वाहनांवर कारवाई करीत ६३ वाहने जप्त केली असून तब्बल ६ लाख ४० हजार ४५० रुपयांचा दंड केला  असल्याची माहिती परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली

याबाबत अधिक माहिती अशी की,वेळोवेळी स्कुलबस धारकांना वाहनांची तपासणी करून घेण्याबाबत कळवले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळालेला होता मात्र अजून बऱ्याच स्कुलबस तपासणी साठी आलेल्या नाहीत त्यासाठी मा परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार व मा उप प्रा परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहा प्रा प अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबवण्यात आली.  सुट्टीच्या दिवशीही (शनिवार व रविवारी) अतिरिक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करून स्कुलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम कार्यालयात सुरु ठेवले आहे. विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी या पुढेही अशी मोहीम राबवून दोषी स्कुलबस वर कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील स्कुलबस चालकांनी अपाॅइंटमेंट घेवून शनिवार व रविवारी विशेष मोहिमेचा  लाभ घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

 २५ जुलै रोजी पंढरपूरमध्ये ४९ वाहनांवर कारवाई करीत १ लाख १४ हजार  दंड केला. तर २८ जुलै रोजी २७ वाहनांवर कारवाई करीत २२ हजारांचा दंड करण्यात आला आहे. यातील बहुतांश स्कुलबस जप्त करण्यात आले असून दंड भरलेनंतर व कागदपञे पुर्तता केल्यानंतर सोडण्यात येणार आहेत. ही कामगिरी परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार व मा उप प्रा परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहा प्रा प अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक संजीव वाडीकर, सहा मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या ढल्लू ,अजित कदम यांनी  कारवाई केली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई