सीआयडीचे पोलीस असल्याचे सांगत लुटले सोने


वाखरी येथे भर दिवसा घडली घटना






 पंढरपूर / प्रतिनिधी :  मी सीआयडीचा साहेब आहे,  गांजा विकणारा माणूस आम्ही शोधत आहोत असे म्हणत वाखरी तालुका पंढरपूर येथे बुधवारी दुपारी दीड वाजता एक लाख 75 हजारचे सोन्याचे दागिने  लुटल्याची घटना घडली.  याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.




 याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की उपरी तालुका पंढरपूर येथील अंकुश रामचंद्र मोहिते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी किसन नागणे यांच्यासोबत शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथे गेले होते.  लग्नकार्य उरकून परत गावाकडे जात असताना दुपारी दीड वाजता  वाखरी चौकाच्या अलीकडील चिंचेच्या झाडाजवळ काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गाडी थांबवण्यास सांगितले.  गाडी थांबवल्यानंतर त्या व्यक्तीने रस्त्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तिस थांबवून त्याचे किसे तपासले व गळ्यातील चैन काढून रुमालात बांधून त्याच्याकडे दिली.  यानंतर मी सीआयडी चा साहेब आहे गांजा पुड्या विकणारा माणूस तपासत असून तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही सोने घालून फिरू नका असे मोहिते यांना म्हणाला. यानंतर मोहिते यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन सोन्याच्या अंगठी व खड्याची अंगठी याचबरोबर खिशातील लायसन व इतर कागदपत्रे त्या अज्ञात इसमाने रुमालात बांधून दिले व तुम्ही इथून जावा असे सांगितल्यानंतर ते उपरी येथे गावाकडे गेले.  मात्र घरी गेल्यानंतर सदर रुमालात सोन्याची चैन व दोन अंगठ्या दिसल्या नाहीत फक्त कागदपत्रे होती त्यामुळे मोहिते यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई