पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन




पंढरपूर / प्रतिनिधी : – रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील व रयत शिक्षण संस्थेतील एक नामांकित  महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी दिली. 
       सोलापूर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले असून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील होत असलेले सर्व बदल महाविद्यालय स्वीकारत असून राष्ट्रीय महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत ६७ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील असते. महाविद्यालयाच्या विकासाची वाटचाल माजी विद्यार्थ्यांना समजावी व या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेता यावे. या उद्देशाने रविवार दि. १५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यास महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थी – विद्यार्थिनीनी उपस्थित राहावे. असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई