गादेगाव येथील विदर्भ कोकण बँक फोडली

 

ही खिडकी फोडून चोरट्यांनी प्रवेश केला






पंढरपूर : गादेगाव ता पंढरपूर येथील  विदर्भ-कोकण ग्रामीण बँक फोडून  चोरी केली आहे.   शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी  संध्याकाळी ६ वाजता बँक बंद केल्यानंतर आज सोमवारी सकाळी ९.३० वाजता कर्मचारी बँक  उघडायला आले होते. यावेळी बँकेत चोरी झालेचे समजले.  सुमारे तीन लाख रोख रक्कमेसह दोन लाखांच्या सोन्याची चोरी झालेची प्राथमिक माहिती मिळत असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 



चोरट्यांनी  आत आल्यानंतर मेन पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट केला असून सीसीटीव्ही कनेक्शन देखील कट केले आहे. याचबरोबर  सायरनचे कनेक्शन कट केलेले आहे. त्यानंतर गॅस कटरने सेफ कट करून चोरी केलेली असल्याचे प्राथमिक तपासात दिसुन येत आहे. घटनास्थळावर पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर तालुका आणी शहर पोलीस ठाण्याची तपास पथके दाखल झाली आहेत. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञ यांचे पथक घटनास्थळी पाचारण केले आहे.

पोलीस अधीक्षक सरदेशपांडे,  अप्पर पोलीस अधीक्षक . हिम्मत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि धनंजय जाधव यांनी तपास सुरू केला आहे.


फिंगर प्रिंट एक्स्पर्ट तपासणी करताना अधिकारी




सविस्तर बातमी थोड्यावेळाने

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई