पंढरपूरमध्ये घरगुती गँसचा काळाबाजार : तहसील प्रशासनाची कारवाई

  


 

 

         पंढरपूर :- पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते. सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवुन गुरुवार दिनांक 22 डिसेंबर २०२२ रोजी  तहसिलदार  सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. यापुढे सतत गँसचा काळाबाजार करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.


पुरवठा निरिक्षक  सदानंद नाईक यांना  पंढरपूर येथील कळशेनगर, वडर गल्ली, जुना अकलूज रोड जवळ असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळाली. तहसिल कार्यालयातील कोतवाल प्रल्हाद खरे, महादेव खिलारे  सदर ठिकाणी गेले असता या ठिकाणी ठिकाणी सुभाष शिवाजी जाधव वय - 64 वर्षे रा. पंढरपूर  घरगुती वापरातील चार घरगुती सिलेंडर  टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे दोन इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा (अंदाजे रक्कम 23000 रू) या मुदेमालासह रंगेहात पकण्यात आले.


तसेच  अंबाबाई पटांगण अंबाबाई देवीच्या समोरच्या बाजुस पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये भरत असताना पकडले. तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने तातडीने पंच व पो.हे.कॉ.गणेश शिंदे यांनी सदर ठिकाणी दोन घरगुती गॅस सिलेंडर तसेच वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिक मोटर असे एकूण 8000/ रुपयांचे साहित्य मिळून आले. याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध तसेच सुभाष शिवाजी जाधव यांच्याविरुद्ध जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई