मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालकाने घेतला एकाचा बळी... उपरी येथील घटना
पंढरपूर / प्रतिनिधि : मद्यधुंद ऊस वाहतुक टॅक्टरचालाकाने माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला जोराची धडक दिली. यामध्ये तुकाराम आत्माराम नागणे वय ७५ रा उपरी यांचा जागीच मृत्यु झाला. हि घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.
सध्या ऊस गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतुक वाहने भरधाव वेगाने जात आहेत. टॅक्टर ड्रायव्हर देखील दारु पिवुन वाहन चालवित असलेने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की डोक्यावरुन दोन्ही टेलरची सर्व चार टायर गेलेने जागीच मृत्यु झाला. आंबे ता पंढरपूर येथील टॅक्टर असलेची प्राथमिक माहिती मिळत आहे. मयत नागणे हे पंढरपूर येथील पुजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील व हनुमान दुध डेअरीचे चेअरमन पैलवान साहेबराव नागणे यांचे चुलते होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा