लहान बाळांच्या हृदयरोगावर पंढरीत होणार मोफत उपचार...


डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने तज्ञ डाॅक्टर करणार उपचार

पंढरपूर / प्रतिनिधि :  लहान‌ बाळांच्या हृदयरोग व अन्य गंभीर आजारावर पंढरपूर मध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. शहरातील तज्ञ डाॅ शितल शहा यांच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबीर व आॅपरेशन खर्च देखील‌ मोफत करण्यात येणार असलेचे डाॅ शितल शहा यांनी पञकार परिषदेत सांगितले. 
० ते १८ वर्षातील  लहान बाळाच्या हृदयाचे छिद्र बंद करण्यात येणार आहे. मुंबई नंतर पंढरपूर मध्ये हे एकमेव सेंटर सुरु झालेने नागरिकांची सोय होणार आहे. 
बाळ निळसर पडणे, वजन न वाढणे, जोरजोरात श्वास लागणे, दुध व्यवस्थित न पिणे, दुध पिताना कपाळावर घाम येणे, वारंवार न्यूमोनिया होणे, हृदयाचे जन्मता छिद्र असणे, ओपनहार्ट शस्ञक्रिया,  फुफसाचे आजार, किडनीचे आजार, मेंदुचे आजार यासह इतर सर्व आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. 
पुणे येथील तज्ञ डाॅ संतोष जोशी हे प्रत्येक रविवारी पंढरपूर मध्ये येवुन या  शिबीरातील बाळांची तपासणी करणार आहेत. याचबरोबर डाॅ शितल शहा, डाॅ सुधीर आसबे, डाॅ विनायक उत्पात, डाॅ सुनिल पटवा, डाॅ पुरुषोत्तम तापडिया,  या हाॅस्पिटलमधील डाॅ विकास मस्के, डाॅ प्रदिपकुमार सुर्यवंशी, डाॅ अबिद अली,  डाॅ सुनिल तडवलकर, भुलतज्ञ डाॅ सुभाष चव्हाण, डाॅ पंकज गायकवाड़, डाॅ अभिजित पाटील, डाॅ श्रीगणेश पाटील, डाॅ संदीप पाटील, डाॅ मेघना चावला, डाॅ अमित  ईनामदार, डाॅ, संदिप नेमाणी, डाॅ रेश्मा मेहता, डाॅ सागर जंगम, डाॅ संभाजी पाचकवडे आदी सर्व विभागातील तज्ञ डाॅक्टरांची सेवा उपलब्ध आहे. 
लहान बाळांवर उपचार करणेसाठी १ कोटी १० लाखांचे कॅथलेब मशीन व ७० लाखांचे हार्ट अॅन्ड लंग्स मशिन उपलब्ध करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई