ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन १ लाख रूपयेचे. बक्षिस मिळवा : -अभिजित पाटील


महाराष्ट्रातला पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम

पंढरपूर / प्रतिनिधि :  कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. 
येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी उद्योगपती अभिजीत पाटील यांच्यावतीने  पंढरपूर तालुक्यात ज्या बिनविरोध ग्रामपंचायत होतील त्यांना यांच्यावतीने १लाख रूपये. बक्षिस म्हणून देण्याची नाविन्या पुर्ण संकल्पना जाहिर केली आहे .हि संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबल्याने सर्व स्थरातून कौतुक होत आहे. 
याकाळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद विवाद,गट तट बाजूला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी,योजनाची माहिती असणारे तरूणांनी व सर्व जेष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल. राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन टोकाच्या विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन जर सरकार स्थापन करू शकतात तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपली ग्रामपंचायत बिनविरोध का करू शकत नाही. हि विचार करण्याची बाब आहे.या उपक्रमामुळे पंढरपूर तालुका राज्यासमोर एक आदर्श निर्माण करेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई