सहकारातील डाॅक्टर हरपले....


माजी आ सुधाकरपंत परिचारक यांचे निधन : सोलापूर जिल्ह्यावर शोककळा

पंढरपूर / प्रतिनिधि:  अनेक बंद पडलेले साखर कारखाने  व तोट्यात असलेले परिवहन महामंडळ फायद्यात आणलेले सहकारातील डाॅक्टर माजी आ सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले. 
माजी आमदार,  सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता  निधन झाले. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आ प्रशांत परिचारक यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. त्यांच्या निधनाने पंढरपूर शहर व तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात  शोककळा पसरली आहे.

परिचारक यांनी तब्बल २५ वर्षे पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.  याचबरोबर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.  त्यांच्या कार्यकाळात तोट्यात असलेले महामंडळ त्यांनी फायद्यात आणले. याचबरोबर  सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या श्रीपुर येथील कारखाना विकत घेवुन सध्या व्यवस्थित चालवत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस दर देणारा कारखाना म्हणुन श्रीपुर कारखान्याची ओळख आहे.   याचबरोबर. मोहोळ तालुक्यातील भिमा  सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे कामही त्यांनी केले. अर्बन बॅक, युटोपीयन शुगर कारखाना, बाजार समिती  यासह तालुक्याती सेवा सोसायट्याच्या परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहेत. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.

5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. यामध्येच त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवार पासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
परिचारक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तरी अशा संकटप्रसंगी त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्ट द्वारे आवाहन केले आहे.


वास्तव न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई