पंढरपूर मध्ये संचारबंदीची जिल्हाधिका-यांनी केली घोषणा....

अखेर लॉकडाऊनचा निर्णय ....... पंढरपूर आणि परिसरात 6 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून कडकडीत बंद !


पंढरपूर मध्ये ७ ते १३ आॅगस्ट संचारबंदीची जिल्हाधिका-यांनी केली घोषणा....


पंढरपूर / प्रतिनिधि: पंढरपूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पर्यंत ५८५ हुन अधिक रुग्ण सापडले असुन १९ जणांचा मृत्यु झाला आहे. पंढरपूर शहर व तालुक्याची परिस्थिति आटोक्यात आणणेसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ७ ते १३ आॅगस्ट पर्यंत संचारबंदी ची घोषणा पञकार परिषदेत केली. आज सोलापूर मध्ये झालेल्या पञकार परिषदेत हि घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त आदी उपस्थित होते. 
पंढरपूर व  परिसरा मध्ये येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची   जिल्हाधिकाऱ्यांनी  घोषणा केली. या कालावधीत प्रदक्षिणा मार्ग आणि परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांची  संख्या कमी झाली नाही तर हाच  लॉक डाऊन आणखी  तीन दिवस म्हणजे १६ आॅगस्ट  पर्यंत वाढणार आहे.  या लाॅकडाऊनमध्ये केवळ दूध ,हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई