महाराष्ट बॅकेकडुन शेतक-यांची अडवणुक ; संतप्त शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन





पंढरपूर / प्रतिनिधि

यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने सध्या शेतकरी पेरणी व ऊस लागवड करत आहेत. माञ पेरणीसाठी शेतक-यांना महाराष्ट बॅक पिक कर्ज देत नसल्याने संतप्त शेतक-यांनी बुधवारी पंढरपूर येथे बोंबाबोंब आंदोलन केले. 
    पंढरपूर येथील   बँक ऑफ महाराष्ट्र  शाखा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा संदर्भात अडवणूक करत आहे.   केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना विविध योजनेद्वारे कर्ज मिळत नाही. म्हणून  बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.  यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर  जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके, नितीन गावडे, तानाजी सोनवले, औदुंबर सुतार, सर्जराव शेळके,  सचिन शिंदे, पोपट सुरवसे, दिलीप नागणे,   जनहित शेतकरी संघटनेचे क्षीकांत नलवडे, सचिन आटकळे, राजाभाऊ साळवे, रमेश लंगोटे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई